जगातील सर्वात उंचावरील युद्धभूमी सियाचीन पर्यटकांसाठी खुले; संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची घोषणा
गृहमंत्री राजनाथ सिंह (फोटो सौजन्य-ट्वीटर)

जगातील सर्वांत उंचावरील युदधभूमी असलेला सियाचीन (Siachen) भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. भारतीय सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आज लडाख (Ladakh) येथील कर्नल चेवांग रिंचेन पुलाचे उद्घाटन करताना त्यांनी घोषित केले आहे. सियाचिन बेस कॅम्प ते कुमार पोस्टरपर्यंतचा सर्व भाग हा पर्यटकांसाठी (Tourists) खुला करण्यात आला आहे. हा भाग अतिशय सुंदर असून पर्यटकांना आकर्षित करणारा ठरणार आहे. जगभरातून अनेक लोक या जागेला पसंती दाखवतील, असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत. भारत आणि चीन यांच्यात सिमेवरून वाद आहे. मात्र हा योग्य पद्धतीने हातळला जात आहे, असेही राजनाथ सिंह त्यावेळी म्हणाले आहेत.

भारताचे सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सियाचीन बेस कॅम्प हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याचे सांगून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लडाखयेथील श्योक नदीवरील कर्नल चेवांग रिंचेन पुलाच्या उद्घाटन करताना ते बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, लडाखमध्ये पर्यटनासाठी प्रचंड वाव आहे. लडाखमधील उत्तम कनेक्टिव्हीटी पर्यटकांना नक्कीच मोठ्या संख्येने इकडे खेचून घेऊन येईल. हा नवा पूल सर्व प्रकारच्या वातावरणातील बदलतातही या भागाला जोडून ठेवेल. तसेच सीमाभागात एक मोक्याची जागा म्हणून तो नावारुपाला येईल.भारताने चीनसोबत सहकार्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. येथे फक्त दोन्ही देशांच्या दृष्टीकोनात फरक आहे. दोन्ही देशांमध्ये वैचारिक मतभेद आहेत.परंतु हा मुद्दा अत्यंत परिपक्वता आणि जबाबदारीने हाताळला गेला आहे. हे देखील वाचा-भारताकडे राफेल विमान दसऱ्याच्या दिवशी सुपूर्द करणार, राजनाथ सिंह राहणार उपस्थित

दरम्यान, लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना काल पीओकेमध्ये दहशतवादी लॉन्च पॅडच्या विरोधात भारतीय सैन्याने घेतलेल्या कारवाईबद्दल सविस्तर माहिती दिली. या काळात लष्करप्रमुख जनरल बिपिन रावतही उपस्थित होते. लडाखमधील पर्यटन आणि विकासाच्या मुद्दय़ावर राजनाथ सिंह म्हणाले की सियाचीन प्रदेश आता पर्यटक व पर्यटनासाठी खुला आहे.