Crime | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) उन्नावमध्ये (Unnao) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्लागंजमध्ये (Shuklaganj) जावयाने घरी आलेल्या सासूची निर्घृण हत्या (Murder) केली. महिलेच्या हत्येमागील कारण धक्कादायक आहे.  बातमीनुसार, आरोपीच्या पत्नीला उपचारासाठी पैसे न दिल्याने तो चिडला,  त्यामुळे त्याने सासूचा खून केला. पत्नीच्या उपचारासाठी पैसे दिले नाहीत, तेव्हा आरोपीने सासूशी शत्रुत्व पत्करले. संतापलेल्या जावयाने आधी सासूला बेदम मारहाण केली. ती गंभीर जखमी झाल्यावर तिला जागीच सोडून पळून गेला. महिलेला गंभीर अवस्थेत पाहून शेजाऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला वाचवता आले नाही. जखमी महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाला.

ही हृदयद्रावक घटना शुक्लागंजच्या ऋषी नगर भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माखी पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी इंद्रकुमार तिवारी यांची मुलगी दीक्षा हिचा विवाह ऋषी नगर येथील आशिष उर्फ ​​पंडित याच्याशी झाला होता. आशिषची सासू वंदना एक दिवस आधीच त्याच्या घरी पोहोचली होती.  पत्नी दिक्षा हिच्या स्टोन ऑपरेशनसाठी जावयाने सासू वंदना यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. हेही वाचा धक्कादायक! 12 वीच्या विद्यार्थ्याची वर्गात शिक्षिकेसमोर चाकू भोसकून हत्या

वंदनाने पैसे देण्यास नकार दिला. संतापलेल्या आशिषने आधी पत्नी दीक्षा हिला मारहाण केली. सासू वंदना यांनी विरोध केला असता तिलाही लोखंडी जाळीने मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उन्नाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हत्येची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.  या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी हत्येचा आरोप करत गंगा घाट पोलिसांकडे तक्रार केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पश्चिम चौकीचे प्रभारी लोकनाथ गुप्ता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मृताचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. तर दुसरीकडे पालिकेचे अधिकारी कृपाशंकर म्हणाले की, एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पंचनामा भरल्यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी तक्रार आल्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल.