delhi Airport INCIDENT pc TW

 Delhi Airport: दिल्लीत राज्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. विमानतळावरात छताचा काही  भाग कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 मध्ये ही घटना घडली. छत कोसळल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेत एकाचा बळी गेला आहे. तर चार जण जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली आहे. (हेही वाचा- उत्तर प्रदेशातील औरैयामध्ये आईने आपल्या 4 मुलांना पाण्यात बुडवले; तिघांचा मृत्यू, एकाने कसाबसा वाचवला जीव (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 च्या छताचा काही भाग कोसळला. यात अनेक वाहने दबले गेले. घटनेची तात्काळ माहिती अग्निशमन दलाला देण्यात आही. पहाटे 5.30 ला माहिती मिळताच, बचाव कार्य सुरु झालं. घटनेच्या वेळी वाहनांमध्ये अनेक प्रवाशी होते. काही प्रवाशी छत कोसळल्याने दबले गेले. तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

छताखाली कोसळलेल्यांना बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांने सांगितले की, या घटनेत एकाचा मृत्यू झाला. चार जण जखमी झाले. जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आला आहे. छत कोसळल्याने विमानतळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दिल्लीत मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळले आहे. मुसळधार पावसामुळे विमानतळात पाणी साचले आहे.