Topper Girl Died Due to Brain Haemorrhage: दहावीत चांगले गुण प्राप्त झाल्यावर भविष्यात चांगल काही करण्याची सर्वाची इच्छा होत असते. कोणाला डॉक्टर तर कोणाला ऑफिसर. पण गुजरातच्या टॉपर मुलीचे डॉक्टर व्हायचं स्वप्न अधुरे राहिले. दहावीच्या परिक्षेत टॉपर असलेल्या १६ वर्षाच्या मुलीचा बुधवारी ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. निकालाच्या चार दिवसानंतर हीर घेटिया हीचा मृत्यू झाला. ही घटना गुजरातच्या मोरबी येथे घडली आहे. (हेही वाचा- जम्मू-काश्मीरमध्ये वेगवेगळ्या रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू, जाणून घ्या अधिक माहिती)
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (GSEB) निकाल 11 मे रोजी जाहीर झाला होता. हिर घेटिया या मुलीने 10 वीच्या परिक्षेत 99. 70 टक्के गुण मिळवले होते. हीर ला ब्रेन हॅमरेज झाला आणि तीला महिनाभरापूर्वी राजकोटमध्ये एका खासगी रुग्णालयात शस्रक्रिया करण्यात आली. तिला डिस्चार्ज देण्यात आला. ऑपरेशननंतर ती घरी गेली, परंतु एका आठवड्यापूर्वी तिला पुन्हा श्वास आणि ह्रदयाचा त्रास होऊ लागला. तिला तात्काळ हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तिला एमआरआय अहवाल समोर आला आणि धक्कादायक माहिती पालकांना मिळाली.
गुजरात बोर्ड में 99.70 प्रतिशत अंकों के साथ टॉप करने वाली हीर घेटिया के निधन का समाचार दुखद है। उनके परिजनों ने नेत्रदान करने के साथ ही मेडिकल छात्रों के शोध के लिए उनका शरीर भी दान कर समाज के सामने बड़ी मिसाल पेश की है। उनका ये फैसला लोगों को मानव कल्याण के लिए प्रेरित करेगा।… pic.twitter.com/Nna8ftXvmd
— Vinod Tawde (Modi Ka Parivar) (@TawdeVinod) May 17, 2024
हीरच्या मेंदूच्या सुमारे 80 ते 90 टक्के काम करणे थांबल आहे. बुधवारी ह्रदयाने काम करणं बंद केल्याने तीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी महत्त्वाचा निर्णय घेत तिचे डोळे आणि तिचे शरिर दान केले. हिरच्या मृत्यू नंतर तिच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. हिरच्या वडिलांनी सांगितले की, तिला भविष्यात डॉक्टर व्हायचे होते. तिचे डोळे घेणाऱ्या व्यक्तीने तिचे डॉक्टर व्हायचे स्वप्न पूर्ण करावी.