reels, PC TW

Gujarat Video: रिल बनवण्यासाठी तरुण पिढी कुठच्या टोकाला जाईल याचा नेम नाही. रिल काढण्यासाठी तरुण चक्क समुद्रात गेले आहे.  गुजरात येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तीन तरुणांनी समुद्रात रिल बनवला आहे. रिल बनवण्यासाठी दोघे जण थार कारसोबत गेले होते. समुद्राच्या पाण्यात रिल काढण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांच्या अंगाशी आले आहे. ही घटना एकाने कॅमेऱ्यात कैद केली आहे. (हेही वाचा- गायीने धडक दिल्यामुळे एका नागरिकाचा मृत्यू, परिसरात व्यक्त केली जात आहे हळहळ)

मिळालेल्या माहितीनुसार, तिघे जण रिलकाढण्यासाठी कच्छच्या भद्रेश्वर येथील समुद्रावर गेले. तीन जणांनी दोन थार गाड्या समुद्राच्या पाण्यात आणल्या.व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, रिल बनवण्यासाठी आलेल्या तिघे जण समुद्रात अडकले आहे, समुद्राच्या पाण्यांची लाट उसळत आहे. तिघे जण समुद्राच्या पाण्यात अडकले आहेत. पाणी गुडघ्यापर्यंत आले होते. गाड्यामध्ये पाणी शिरले आहे. समुद्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरु होतो. तरुणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मोठ्या प्रयत्नानंतर आणि स्थानिकांच्या मदतीने महिंद्रा थार वाहन समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली. गुजरात येथील हा विषय चर्चेचा ठरला आहे. समुद्रात रिल काढणे तरुणाच्या जीवाशी बेतले असते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोन चालकांवर एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 279, 114 आणि मोटार वाहन कायदा कलम 177, 184 अन्वये गुन्हा दाखल केला.