Tirunelveli Shocking Accident: गायीने धडक दिल्यामुळे एका नागरिकाचा मृत्यू, परिसरात व्यक्त केली जात आहे हळहळ

तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे भीषण रस्ता अपघात झाला आहे. ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला काही गुरांमध्ये भांडण झाले. त्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला गाय थेट धडकल्याने दुचाकीस्वार थेट बसखाली आला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वेलयुधराज असे या 58 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून तो न्यायालयात कर्मचारी होता.

व्हायरल Shreya Varke|
Tirunelveli Shocking Accident: गायीने धडक दिल्यामुळे एका नागरिकाचा मृत्यू, परिसरात व्यक्त केली जात आहे हळहळ
Tirunelveli Shocking Accident

Tirunelveli Shocking Accident: तामिळनाडूतील तिरुनेलवेली येथे भीषण रस्ता अपघात झाला आहे. ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला काही गुरांमध्ये भांडण झाले. त्यामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीला गाय थेट धडकल्याने दुचाकीस्वार थेट बसखाली आला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वेलयुधराज असे या 58 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून तो न्यायालयात कर्मचारी होता. तो वेलयुधराज मॅजिस्ट्रेट कोर्टात काम करत होता आणि बाईकवरून त्याच्या ऑफिसला जात होता, या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्हाला दोन  गायी रस्त्यावर भांडताना दिसत आहेत. दरम्यान, वेलयुधराज हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना एका गायीने त्यांना धडक दिली. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या बसची त्यांना धडक बसली.

व्हिडिओ पाहा:

या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण आहे. रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याचे दिसून येत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत. अनेक शहरांमध्ये गुरे उघड्यावर सोडल्याप्रकरणी मालकावर कारवाई केली जाते. पण काही दिवसांनी वेगवेगळ्या परिस्थितीमुळे पुन्हा तोच त्रास होतो. या घटनेत एका व्यक्तीचा जीव गेल्यानंतर पुन्हा एकदा पशुपालकांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

 

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel