Representational image (Photo Credit- IANS)

Telangana Shocker:  तेलंगणात एका पत्नीने सुपारी देऊन पतीची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पत्नीने आपल्या विभक्त आणि ट्रान्सडजेंडर पतीला मारण्यासाठी भाड्याने मारेकरू ठेवले होते. ही घटना तेलंगणा येथील सिद्दी पेठ या गावातील आहे. प्रकरणी पोलिसानी महिलेसोबत आणखी तीन पुरुषांना अटक केले आहे. महिलेने हत्येसाठी 18 लाख रुपयांची ऑफर दिली होती, अशी माहित पोलिसांनी रविवारी दिली. आरोपी पुरुषांना महिलेने 4.6 लाख दिले होते. गेल्या वर्षी 11 डिसेंबर रोजी ट्रान्सजेंडर व्यक्तीची हत्या केली. (हेही वाचा- पतीच्या डोक्यात हतोडा घालून केली हत्या, आरोपी पत्नीला अटक)

मिळालेल्या माहितीनुसार,शनिवारी पतीच्या खुनाच्या आरोपाखाली महिला आणि भाड्याच्या दोन मारेकऱ्यांना अटक केली. 2014 साली दोघांचे लग्न झाले होते आणि 2015 मध्ये त्यांना मूल झाले होते. त्यानंतर 2019 मध्ये पतीने स्त्री होण्यासाठी लिंग पुनर्नियुक्तीची शस्त्रक्रिया केली.तेव्हापासून दोघेही वेगळे राहत होते. महिला एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार करायची.नंतर या ट्रान्सजेंडर व्यक्तीने महिलेचा छळ करण्यास सुरुवात केला. रोज तो रस्त्यावर भीक मागायचा अशी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर त्याने आपल्या मुलाला देखील भीक मागणयास सांगायचा. भीक मागण्यासाठी तो कधी कधी तिच्या शाळेत जायचा आणि तिथे उपद्वव घालायचा. त्यानंतर महिलेला शाळेतून काढण्यात आले.

या गोष्टीचा राग मनात धरत महिलेने पतीला संपवण्याचे प्लॅनिंग केले.त्यानंतर त्याच शहरातील बोनी रमेश याच्याशी मैत्री झालेल्यानंर त्यांनी पतीला मारण्यासाठी प्लॅन केल. प्लॅननुसार, इप्पा शेखर हा पीडितेच्या घरी गेला त्यावेळी पीडिताला भरपूर दारून पाजली. दारूच्या नशेत त्या तोंडावर उशी दाबून त्याची हत्या केली. या प्रकरणी वननगर पोलिस ठाण्यात संशयास्पद मृत्यूची नोंद करण्यात आली. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवल्यानंतर अहवाल आला आणि अहवालात खूनामुळे मृत्यू झाल्याचे समजले. पोलिसांनी पतीची चौकशी केल्यानंतर तीनं खूनाची कबुली दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेसह तीन आरोपींना ताब्यात घेतले.