Delhi Shocker: वादविवादामुळे टॅंकर चालकाने तरुणाला चिरडले,  दिल्लीतील धक्कादाय घटना (Watch video)
delhi Crime PC Tw

Delhi Shocker: दिल्लीच्या संगम विहार भागात एका टॅंकरने तरुणाला चिरडले आहे. रस्त्यावर पावसामुळे पाणी साचले होते त्यावेळी चालकाने तरुणाला चिरडले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गुरुवारी संगम विहार परिसरात काही लोकांनी पाण्याच्या टॅंकरवर दगडफेक केली होती. त्यामुळे रागाच्या भरात टॅंकर चालकाने तरुणाला चिरडले. यात त्याचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. (हेही वाचा- पश्चिम बंगालमध्ये मुलीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल, भाजपची ममता बॅनर्जीं सरकारवर टिका

मिळालेल्या माहितीनुसार, संगम विहारच्या अरुंद गल्लीत ही घटना घडली. गल्लीत सर्वत रस्ते पाण्याचे साचले आहे. ऑटोरिक्षा बिघडली असलाताना त्यात प्रवास करणारे लोक तिची दुरुस्ती करण्यात व्यस्त होते. याचवेळीस भरधाव वेगात टॅंकर आला आणि त्याने लोकांनावर साचलेले पाणी उडवले. याच गोष्टीचा राग आल्यावर स्थानिकांनी टॅंकरवर दगडफेक केला. दोघांमध्ये खुप मोठी वाद विवाद झाला. टॅंकरला तोडफोड करत असताना चालकाने स्थानिकांच्या अंगावर गाडी घातली. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला.

पाहा व्हिडिओ

सुरुवातीला टॅंकर चालकाला गाडीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न करत होते परंतु ते बाहेर पडले नाही. एका तरुणाने टॅंकरवर अनेकवेळा दगडफेक केला आणि टॅंकरची काच फोडली. टॅंकर चालकाने या रागाच्या भरात समोर असलेल्या तरुणांच्या अंगावर गाडी घातली. तरुणाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु त्याच्या मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, टॅंकर चालक सपन सिंग घटनास्थळावरून फरार झाला आहे, तर शाहदाब उर्फ सद्दाम याचा मृत्यू झाला.