कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील धार्मिक, सास्कृतिक आणि समाजिक स्थळ बंद करण्यात आली होती. मात्र, देशात गेल्या काही दिवसांपासून अनलॉकला सुरुवात झाली आहे. ज्यामुळे बऱ्याच गोष्टी टप्प्याटप्याने सुरु केल्या जात आहेत. यातच लाकडाऊनमुळे तब्बल सहा महिने बंद असलेले ताजमहाल (Taj Mahal) आजपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नुकसान सहन करावे लागणाऱ्या हॉटले व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पर्यटकांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, ताजमहालात एका दिवसात केवळ 5 हजार पर्यटकांना भेट देता येणार आहे. तर, लाल किल्ल्यात 2 हजार 500 पर्यटकांना जाता येणार आहे. महत्वाचे म्हणजे, दोन्ही स्मारकाचे बुकींग काऊंटर बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे पर्यटकांना ऑनलाइन तिकीट बूक करावे लागणार आहे. एएसआय वेबसाइटवरदेखील ऑनलाइन तिकीट बूक करता येणार आहे. हे देखील वाचा- COVID 19 Vaccine Update: भारतात कोरोनावरील 30 लसींची चाचण्या सुरु- आरोग्यमंंत्री डॉ. हर्षवर्धन
एएनआयचे ट्विट-
Agra: Thermal screening of visitors being done at Taj Mahal, as the monument reopens for public from today. pic.twitter.com/YqHR94eub8
— ANI UP (@ANINewsUP) September 21, 2020
पर्यटकांना वाहन पार्किंगसह सर्व पेमेंट ऑनलाइन भरावे लागणार आहे. दरम्यान, पर्यटकांना मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. ताजमहालमधील मुमताज आणि शाहजहांच्या मुख्य मकबऱ्याजवळ केवळ 5 जणांना जाता येणार आहे. महत्वाचे म्हणजे, ताजमहालमध्ये प्रवेश करण्याआधी पर्यटकांचे थर्मल स्क्रीनिंग केली जाणार आहे.