UP Crime: उत्तर प्रदेशातील नोएडा येथून चोरीची घटना उघडकीस आली आहे. स्वीगी इन्स्टामार्ट डिलीव्हरी बॉयने घराबाहेर ठेवलेले महागडे शूजची चोरी केली आहे. ही घटना घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- वामन हरी पेठे ज्वेलर्समध्ये 27 कोटी रुपयांच्या सोन्यावर डल्ला, आरोपींना अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १७ सप्टेंबर रोजी घडली आहे. या घटनेनंतर तक्रारदाराने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश सेक्टर ११३ पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे.एका एक्स युजरने हा व्हिडीओ शेअर केला (हेही वाचा-मुंबई विमानतळावर चोरी, चक्क 10 लाख रुपयांचा चेक चोरला, गुन्हा दाखल)
पहा शूज चोरीचा व्हिडिओ
UP: नोएडा में चोरी की अनोखी घटना आई सामने ,स्विगी कंपनी के डिलीवरी बॉय सामान की डिलीवरी करने के साथ चोरी की घटनाओं को दे रहे हैं अंजाम ,घर के बाहर रखे हुए कीमती जूते चुराकर स्विगी का डिलीवरी बॉय आसानी से हुआ फरार ,चोरी की सारी वारदात घर के बाहर लगे हुए सीसीटीवी कैमरे में हुई कैद… pic.twitter.com/4TgDvuzVbG
— निशान्त शर्मा (भारद्वाज) (@Nishantjournali) September 16, 2024
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, डिलीव्हरी बॉयने सामान घरी पोहचवले. त्यानंतर पायऱ्यांनी खाली आला आणि घरासमोर ठेवलेल्या शूज रॅकवरून त्याने महागडे शूज बॅगमध्ये टाकले. शूज घेऊन चोर घरासमोरून फरार झाला. चोरीच्या या घटनेनंतर सोसायटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. परिसरात चोरीच्या घटना वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी कंमेट केले.