Delhi: ईशान्य दिल्लीतील ब्रिज पूरी भागात मदरशात एका पाच वर्षाच्या मुलाचा संशयित मृत्यू झाला. या घटनेनंतर दिल्लीत एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. (हेही वाचा- धक्कादायक! ठाणे जिल्ह्यात प्रतिदिन एका पॉक्सो कायदा प्रकरणाची नोंद, एकट्या कल्याणमध्येच 25% पेक्षा अधिक घटना; वर्षभरातील आकडेवारी)
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सांयकाळी 9. 45 च्या दरम्यान मुलाच्या मृत्यूसंदर्भात पोलिसांना फोन आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतला. मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात समोर आले की, मुलाची हत्या करण्यात आली आहे. मुलाच्या मानेवर, पोटावर आणि मांडीवर मोठ्या प्रमाणात फोड आणि जखमा होत्या. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अहवालांची प्रतिक्षा आहे. तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
पोलिसांनी मृत मुलाच्या आईशी संपर्क साधला. तिने सांगितले की, मुलाला पाच महिन्यांपूर्वीच मदरसा येथे सोडले होते. २३ ऑगस्ट रोजी सांयकाळी मुलगा आजारी असल्याची माहिती मिळाली होती. तिने त्याला ब्रिजपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर तिने मृतदेह परत मदरसा येथे आणला, जिथे मोठा जमाव जमला. त्यानंतर मृतदेह जीटीबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला आणि काही पालकही आले आणि त्यांच्या मुलांना घेऊन गेले.