Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Tamil Nadu Shocker: चेन्नईतील मागच्या महिन्यात एका अपार्टमेंटधून बाल्कनीच्या शेडवर आईच्या हातातून चिमुकलं बाळ पडलं होते त्यावेळीस धाडसी वृत्ती दाखवत शेजारच्यांनी बाळाला बाचवले होते. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. नेटकऱ्यांनी बाळाच्या आईच्या निष्काळजीला टीका केली होती. या टीकेला कंटाळून बाळाच्या आईने आत्महत्या करत आयुष्य संपवले आहे. (हेही वाचा-पुणे अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी; मार्चपासून विनाक्रमांक धावत होती गाडी)

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्याग्रस्त महिला पती सोबत चेन्नईतील थिरुमुल्लैवोयल येथे वास्तवास होती. पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरु केली. पोलिसांनी सांगितले की, बाळ तिच्या हातातून चूकून निसटले होते आणि, अपार्टमेंटच्या बाल्कनीच्या शेटवर पडले. 18 मे रोजी महिला तिच्या पाकलांना बेशुध्द अवस्थेत सापडली होती. पालकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आठ महिन्यांचे बाळ शेटवर पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होता. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेक युजर्संनी आईच्या निष्काळजीपणावर संशय व्यक्त केला. तीला टीका करत होते. या टीकाला कंटाळून महिलेने राहत्या घरात आत्महत्या केली. पोलिस या प्रकरणी पुढील तपासणी करत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.