Photo Credit -X

पुण्यातील हिट अँण्ड रन केसची सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे. पुण्यात आलिशान पोर्शे कारने (Porsche Car) दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे तरुण-तरुणी मृत्युमुखी पडले. याप्रकरणी वेदांत अग्रवाल (Vedant Agrawal) याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.  अल्पवयीन आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी पुणे पोलिसांनी आरोपी वेंदात अग्रवाल याला अटक करण्यात आले. गुन्हा दाखल होताच, आरोपीचे वडिल फरार झाले होते.  (हेही वाचा -  Pune Porsche Car Accident: पोर्शे कारच्या अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल यांना अटक, संभाजीनगर येथून घेतेले ताब्यात)

दरम्यान अपघातील आलिशान पोर्शे गाडीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने चालविलेली कार केवळ विनाक्रमांकच नव्हती. तर ही कार विनानोंदणीच (विनारजिस्ट्रेशन) रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरुमध्ये तात्पुरती नोंदणी करुन ही कार पुण्यात आणण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक कार्यालयात सुरु होती. मात्र ती अजूनपर्यंत पूर्ण झाली होती. त्यामुळे ही कार इतके दिवस विनानोंदणी रस्त्यावर धावत आहे.

आज न्यायालयात काय निकाल लागेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. वेंदातला वाचवण्यासाठी एकीकडून प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. बड्या बापाचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यात येत आहे. विशाल अग्रवाल यांनी मुलाला विनापरवाना पोर्शे कार चालवण्यास दिली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढं नाही तर आरोपी चालक हा अल्पवयीन असून त्याला कार चालवण्यास परवानगी दिली.  या प्रकरणी वेंदातला दारू देणाऱ्या दोन पबवर कारवाई करण्यात येणार आहे.