Madhya Pradesh Accident: अनियंत्रित ट्रकचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू, शाजापूर येथील घटना

मध्य प्रदेशातील शाजापूर येथे शुक्रवारी भीषण अपघात झाला आहे. एका ट्रकची दोन गायीला धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. अपघातामुळे आणखी दोन धडक धडकले.

Madhya Pradesh Accident: अनियंत्रित ट्रकचा भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू, शाजापूर येथील घटना
Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील शाजापूर येथे शुक्रवारी भीषण अपघात झाला आहे. एका ट्रकची दोन गायीला धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. अपघातामुळे आणखी दोन धडक धडकले. या अपघातात दुर्दैवाने दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत. वाहनांची धडक बसल्याने दोन गायींचा जागीचा मृत्यू झाला.  (हेही वाचा- भररस्त्यात तीन अल्पवयीन मुलांचा धोकादायक स्केटींग स्टंट, व्हायरल व्हिडिओवर नेटकरी संतापले)

मिळालेल्या माहितीनुसार, शाजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग ५२ वर शुक्रवारी पाहेट हा अपघात झाला. दोन आयशर ट्रक आणि मोठ्या ट्रकची धडक झाली. ही धडक गायींना देखील लागली. दुर्दैवाने या धडकेत वाहनांची धडक बसून दोन गायींचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमींना बाहेर काढले.

जखमींना शाजापूर येथीली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. घटनास्थळी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने हटवले आहे. हा अपघात कसा झाला याची नेमकी माहिती समोर आली नाही. ट्रकचा ब्रेक लावता अनियंत्रित ट्रक पलटी झाला. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. मागून येणाऱ्या दोन गाड्यांनी या पलटी झालेल्या ट्रकला धडक दिली.

(The above story first appeared on LatestLY on Aug 16, 2024 02:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).