Delhi Free Electricity Subsidy: दिल्लीत आजपासून अनुदानित वीज बंद; केजरीवाल सरकारने का घेतला निर्णय? वाचा सविस्तर
Delhi Minister Atishi (PC-ANI)

Delhi Free Electricity Subsidy: दिल्ली सरकारचे वीज मंत्री आतिशी (Delhi Minister Atishi) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उपराज्यपालांनी फाईल मंजूर न केल्यामुळे दिल्लीतील 46 लाख कुटुंबांची वीज सबसिडी (Delhi Free Electricity Subsidy) बंद केली जाणार आहे. दिल्लीतील जनतेने निवडून दिलेले अरविंद केजरीवाल सरकार, दिल्लीकरांना दरमहा 200 युनिट्सपर्यंत मोफत आणि 201 ते 400 युनिटपर्यंत 50 टक्के सबसिडी देते.

दिल्ली सरकारचे ऊर्जा मंत्री आतिशी यांनीही सबसिडी थांबवण्याचे कारण स्पष्ट केले. आतिशी यांनी सांगितलं आहे की, 'मोफत वीज सबसिडी बंद केली आहे. कारण 'आप' सरकारने येत्या वर्षभरासाठी सबसिडी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र फाइल दिल्ली एलजीकडे आहे आणि जोपर्यंत फाइल परत येत नाही, तोपर्यंत 'आप' सरकार सबसिडी बिल जारी करू शकत नाही.' (हेही वाचा - Ram Navami Hate Speech Case: उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या काजल हिंदुस्तानीला जामीन मंजूर; द्वेषपूर्ण भाषणासाठी करण्यात आली होती अटक)

दिल्लीच्या जनतेसाठी हा मोठा धक्का आहे. अतिशी याच्या पत्रकार परिषदेनंतर, एलजीने आपले विधान जारी केलं आहे. या निवेदनात ऊर्जामंत्र्यांना एलजीवर अनावश्यक राजकारण आणि बिनबुडाचे खोटे आरोप टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी खोटी विधाने करून जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, आणि मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील जनतेला उत्तर द्यावे की, 15 एप्रिलची मुदत असताना 4 एप्रिलपर्यंत यासंदर्भातील निर्णय का प्रलंबित ठेवण्यात आला? 11 एप्रिललाच फाइल एलजीकडे का पाठवली? आणि 13 एप्रिलला पत्र लिहून आज पत्रकार परिषद घेऊन नाटक करण्याची काय गरज आहे?

एलजीने दिल्लीची मोफत वीज बंद केली असल्याचा आरोप आतिशीने केला आहे. यामुळे 46 लाख कुटुंबे, शेतकरी, वकील आणि 1984 दंगलग्रस्तांना मोफत वीज मिळणे बंद होणार आहे. एलजी दिल्ली सरकारच्या वीज अनुदानाची फाईल घेऊन बसले आहेत.