Ram Navami Hate Speech Case: उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या काजल हिंदुस्थानी (Kajal Hindustani) यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील उना शहरात द्वेषपूर्ण भाषण दिल्याप्रकरणी काजलला अटक करण्यात आली होती. उनाच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रेखा असोदिया यांनी जामनगर येथील रहिवासी काजलला काही अटींसह जामीन मंजूर केला. काजलच्या जामीन अर्जावरील निर्णय न्यायालयाने दोन दिवस राखून ठेवला होता. अटींनुसार, आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना दर महिन्याला दोनदा त्यांच्या राहत्या घराजवळील पोलिस ठाण्यात हजर राहावे लागेल. सुनावणीला हजर राहण्याशिवाय ती सुनावणी पूर्ण होईपर्यंत गीर सोमनाथ जिल्ह्यात प्रवेश करणार नाही, अशी अटही न्यायालयाने घातली आहे. याशिवाय जामिनावर बाहेर असताना त्या तक्रारदार किंवा साक्षीदारांना प्रभावित करणार नाही किंवा धमकावणार नाही, अशी हमीही न्यायालयाने आरोपीकडून घेतली आहे. (हेही वाचा - HC On Second Marriage: पहिल्या लग्नादरम्यान दुसरे लग्न झाल्यास सरकारी कर्मचाऱ्याच्या दुसऱ्या पत्नीला पेन्शन मिळू शकत नाही; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय)
Ram Navami Hate Speech Case: Gujarat Court Grants Bail To Kajal Hindustani @ISparshUpadhyay #KajalHindustani #Hatespeech https://t.co/bmO3ginG6v
— Live Law (@LiveLawIndia) April 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)