(Photo Credit- Pixabay)

Food Poisoning in Deoria: उत्तर प्रदेशातील देओरीया भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. मेहरूना गावाजवळील पंडित दिनदयाल उपाध्याय आश्रम कॉलेजमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. कॉलेजमध्ये सहावी ते बारावी पर्यंते विद्यार्थ्यी आहेत. कॉलेज कॅन्टीन मधील जेवण जेवल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती बिघाडली. 80 विद्यार्थ्यांवर उपचार सुरु अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी अद्याप कोणावर ही गुन्हा दाखल झाला नाही. या प्रकरणी पुढील कारवाई लवकर केली जाईल. (हेही वाचा- मुसळधार पावसामुळे दोन घरे कोसळली, आठ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी रविवारच्या रात्री कॅन्टीनमध्ये जेवण केले होते. जेवल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, पोटदुखी, उटलीसारखे होऊ लागले. त्यामुळे सोमवारी सकाळी आजारी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. 80 विद्यार्थ्यांवर उपचार सुरु झाले. उपचार झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. सद्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणी कॉलेज कॅन्टीनमधील जेवणाची तपासणी केली जाईल.

दोन विद्यार्थ्यांना सराकरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील रिपोर्टनुसार, दोघांना विषबाधा झाली. बाकीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती ठिक आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पोलिस अधिकारी संकल्प शर्मा यांची कॉलेजमध्ये जाऊन चौकशी आणि तपासणी केली. विषबाधा झाल्यामुळे कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे कॅन्टीनचे पदार्थ प्रयोगशाळेत टेस्टींगसाठी पाठवले आहे. अहवालाची प्रतिक्षा आहे. अहवालानुसार पुढील कारावाई केली जाईल अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.