भयंकर! शौचालयात सॅनिटरी पॅड सापडल्याने विदयार्थीनींना कपडे काढायला लावले
फोटो सौजन्य - फाइल फोटो

चंदीगढ येथे फजिलकामधील एका गावात शाळेच्या शौचालयामध्ये सॅनिटरी पॅड सापडल्याने शाळेच्या विद्यार्थीनींना चक्क कपडे काढण्यास सांगितल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. तसेच वर्गशिक्षिकेने मासिक पाळी कोणाची सुरु असल्याचे पाहण्यासाठी असे कृत्य केले आहे.

कुंडल गावातील सातवीच्या विद्यार्थींनी पैकी कोणाला तरी मासिक पाळी आली होती. त्यामुळे शाळेच्या शौचालयात शिक्षिकेला सॅनिटरी पॅड दिसून आले. या कारणावरुन शिक्षिकेने संताप व्यक्त करत सातवीच्या विद्यार्थीनींना आठवीच्या विद्यार्थांसमोर कपडे उतरवण्यास सांगितले. या प्रकरणी विद्यार्थीनीनी पालकांकडे तक्रार केली. तेव्हा शाळेचे व्यवस्थापक आणि वर्गशिक्षिका यांना अटक  करण्यात आली आहे.
तसेच चौकशी दरम्यान वापरलेले सॅनिटरी पॅड हे कचरा डब्यात न टाकता शौचालयात फेकल्याच्या कारणावरुन हे कृत्य केल्याचे शिक्षिकेने कबुल केले आहे.