छत्तीसगडमधील (Chhattisgarh) रायपूर (Raipur) येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला त्याच्या नावाच्या आणि मोबाईल नंबरच्या स्लिप लोकांच्या घरी फेकल्याप्रकरणी आणि सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केल्याप्रकरणी अटक (Arrested) करण्यात आली आहे. ही घटना नवा रायपूरच्या सेक्टर 30 मधील अविनाश न्यू कॉलनीतील आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून काही लोकांना विचित्र चिठ्ठ्या आल्या आहेत. लोकांच्या म्हणण्यानुसार, स्लिपमध्ये विद्यार्थ्याने स्वत:ला 'प्लेबॉय' (Playboy) म्हणून सांगून मोबाईल नंबर देण्यासोबतच सेक्सची ऑफर दिली आहे. या अश्लील चिटांमुळे व्यथित झालेल्या रहिवाशांनी हा माणूस कोण आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडला नाही.
यानंतर रहिवाशांनी पोलिसात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. राखी पोलिस ठाण्याचे प्रभारी राजेंद्र जैस्वाल यांनी सांगितले की, पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली आणि चिटमध्ये नमूद केलेल्या नंबरवर कॉल केला. कॉल आल्यानंतर त्यांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण नवा रायपूर येथील एका कॉलेजमध्ये शिकतो. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याने हे अश्लील कृत्य का केले हे जाणून घेण्यासाठी सध्या त्याची चौकशी सुरू आहे. हेही वाचा Delhi Accident: संतापजनक! स्कूटीवरून जाणाऱ्या मुलीला भरधाव कारने दिली धडक; 4 किलोमीटर फरफटत नेल्यानंतर मुलीचा जागीच मृत्यू
या घटनेबाबत पोलीस अधिक काही सांगण्याचे टाळत आहेत. या तरुणाचे नाव बदनाम करण्यासाठी कोणी असा प्रकार केला आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. चिटवर लिहिलेला फोन नंबर एका मुलीचा असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली असून तिला त्रास देण्यासाठी ही स्लिप जाणीवपूर्वक वाटण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.