Road Accidents | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Delhi Accident: दिल्लीतील कांझावालामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या मध्यरात्री एक तरुणी वाहनाखाली अडकली आणि कारने तिला तब्बल 4 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. तिच्या अंगावरून सर्व कपडे फाटले गेले. त्यानंतर मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी कारमधील पाच आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

हे प्रकरण अपघाती असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कांजवाला परिसरात एका मुलीचा विवस्त्र मृतदेह रस्त्यावर पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. क्राईम टीमला घटनास्थळी पाचारण करून फॉरेन्सिक पुरावेही गोळा करण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी कारचा शोध सुरू केला. मात्र, ही कार सुलतानपुरी येथे बिघडलेल्या अवस्थेत आढळून आली. (हेही वाचा - Uttarakhand Shocker: नववर्षानिमित्त मद्यधुंद अवस्थेत 3 डॉक्टरांचा रस्त्याच्या मधोमध धिंगाणा, व्यवस्थापनाने केले निलंबित)

त्याचवेळी पोलिसांना अपघातग्रस्त स्कूटीही सापडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर स्कूटीवर जाणारी एक मुलगी वाहनाच्या चाकात अडकून वाहन तिला लांबपर्यंत ओढत नेल्याचे आढळून आले. (हेही वाचा - Sexual Harassment Case: लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हरियाणाचे क्रीडा मंत्री Minister Sandeep Singh यांचा राजीनामा; म्हणाले- 'माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न')

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडलेला पाहायला मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. प्राथमिक तपासात पोलिसांनी या प्रकरणाला अपघात असल्याचे म्हटले आहे. तपासात समोर आले की, अपघातानंतर मुलगी गाडीने खेचत लांब गेली. त्यामुळे तिचे कपडे फाटले.

मुरथल सोनीपत येथून मंगोलपुरी येथील त्यांच्या घरी परतत असलेले आरोपी मुले मद्यधुंद अवस्थेत असताना सुलतानपुरीजवळ त्यांच्या कारने मुलीच्या स्कूटीला धडक दिली. यानंतर मुलगी गाडीखाली अडकली आणि कारमधील चालकाने तिला 4 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं.

कांझावाला येथील जोंटी गावाजवळ गाडीखाली मुलीचा मृतदेह अडकलेला पाहून रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला. एका खासगी समारंभात वेलकम गर्ल म्हणून काम करून ही मुलगी काल रात्री उशिरा घरी परतत असल्याची माहिती आहे. त्याच दरम्यान तिचा अपघात झाला. सध्या गाडी चालवणारा आरोपी अमित आणि कारमध्ये बसलेल्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.