Stray Dogs (फोटो सौजन्य - Pixabay)

Stray Dogs Attack On Girl: अलवर (Alwar) जिल्ह्यातील खैरथल येथील किरवारी गावात भटक्या कुत्र्यांनी सात वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला (Dog Attack) केला. भटक्या कुत्र्यांनी (Stray Dogs) मुलीला अनेक ठिकाणी चावा घेतला. परिणामी गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीचा मृत्यू झाला. इक्राना असे या मृत मुलीचे नाव आहे. ती तिच्या गावातील इतर मुलांसोबत शेतावर गेली होती. मुलांसह मळ्यात उपस्थित असलेल्या आजोबांनी त्यांना तिथेच थांबण्याची सूचना केली आणि ते बाजारात गेले.

6-7 भटक्या कुत्र्यांनी केला चिमुरडीवर हल्ला -

दरम्यान, सायंकाळी मुले घरी परतायला लागली असता वाटेत 6-7 भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी इक्रानाला घेरले आणि तिला अनेक ठिकाणी ओरबाडले. त्यामुळे ती रक्तबंबाळ झाली. मुलांचा आरडाओरडा ऐकून शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा -Mira Road Stray Dog Attack Case: मीरारोड मध्ये 8 वर्षीय मुलावर कुत्र्याचा भीषण हल्ला; डॉक्टरांनी दिला प्लॅस्टिक सर्जरीचा सल्ला)

मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले -

शेतकऱ्यांनी जखमी मुलीला ट्रॅक्टर-ट्रॉलीत टाकून रुग्णालयात नेले. मात्र, मुलीला खैरथळ सॅटेलाइट रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. तसेच मृत मुलीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (हेही वाचा -Pune Stray Dog Attacks: पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांत वाढ; 2024 मध्ये 23 हजारहून अधिक प्रकरणांची नोंद)

यापूर्वी भटक्या कुत्र्यांचे प्राण्यांवर हल्ले -

या भटक्या कुत्र्यांनी यापूर्वीही अनेकदा प्राण्यांवर हल्ले केले असून आता ते मानवांना लक्ष्य करत असल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले आहेत. या समस्येबाबत नगर परिषदेकडे अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, अद्याप ठोस पावले उचलली गेली नाहीत. या वेदनादायक घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.