Delhi: हनुमान जन्मोत्सवादरम्यान शोभा यात्रेवर दगडफेक, दगडफेकीत पोलिसांसह अनेक जण जखमी
Photo Credit - ANI

दिल्लीतील जहांगीरपुरी येथे शनिवारी सायंकाळी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गोंधळ झाला. मिरवणुकीदरम्यान दगडफेकीनंतर प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेला हाताळताना अनेक पोलीस जखमी झाले आहेत. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पोलीस आयुक्तांकडून या घटनेची माहिती घेतली आहे. कुशल सिनेमाजवळ ही घटना घडली. लोकांनी दोन वाहने जाळली. एका दुकानालाही आग लागली आहे. एका पोलिसालाही गोळी लागल्याचे वृत्त आहे. जिल्हा पोलिस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले आहेत. तपासासोबतच लोकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की जहांगीरपुरी येथे मिरवणुकीत निघालेल्या लोकांवर दगडफेक आणि तुरळक जाळपोळ करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tweet

केजरीवाल यांचे आवाहन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, "मी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो कारण त्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. राष्ट्रीय राजधानीत शांतता राखणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे; लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो." (हे देखील वाचा:

Tweet

अमित शहा यांनी आयुक्तांशी चर्चा केली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जहांगीरपुरी घटनेबाबत दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यास सांगितले. दुसरीकडे, या गोंधळात अनेक पोलीस जखमी झाल्याचे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुशल सिनेमाजवळ दगडफेक झाली.