महसूल कमाईच्याबाबतीत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ने ‘ताजमहाल’लाही टाकले मागे
Statue of Unity and Taj Mahal (PC - wikimedia)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2018 मध्ये भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांच्या 182 मीटर पुतळ्याचे अनावरण  करण्यात आले. त्यानंतर ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (Statue of Unity) या पर्यटन स्थळाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. परिणामी महसूल कमाईच्याबाबतीत ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ने जग प्रसिद्ध अशा ‘ताजमहाल’लाही (Taj Mahal) मागे टाकले आहे. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ने वर्षाभरात 63 कोटींची कमाई केली आहे. तसेच ताजमहालला पर्यटनातून 56 कोटींचा महसूल मिळाला आहे. (हेही वाचा -स्टॅच्यू ऑफ युनिटी : सरदार पटेलांचा 182 मीटर उंचीचा पुतळा तयार ; ही आहेत पुतळ्याची वैशिष्ट्ये)

स्मारक                         महसूल              पर्यटकांची संख्या

स्टॅच्यू ऑफ युनिटी      63 कोटी              24.44 लाख

ताजमहाल                     56 कोटी            64.58 लाख

आग्रा किल्ला               30.55 कोटी        24.98 लाख

कुतुब मीनार               23.46 कोटी         29.23 लाख

फतेपुरसिक्री               19.04 कोटी          12.63 लाख

लाल किल्ला                 16.17 कोटी          31.79 लाख

हेही वाचा - 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट देण्यासाठी कसे पोहचाल आणि काय आहेत तिकीट दर ?

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेच्या अहवालानुसार, ताजमहालला भेट देणाऱ्या पर्यंटकांची संख्या जास्त आहे. ताजमहालला एका वर्षात 64.58 लाख लोकांनी भेट दिली आहे. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीला एका वर्षात 24 लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. या यादीत कुतुबमीनार, आग्रा किल्ला, लाल किल्ला आणि फतेहपूरसिक्री या पर्यटनस्थाळांचादेखील समावेश आहे.