One-Day CM: हरिद्वारमध्ये राहणारी सृष्टी गोस्वामी होणार एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री; 'हे' महत्त्वाचं काम करणार
Chief Minister Trivendra Singh Rawat (Photo Credit - Facebook)

One-Day CM: उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये राहणारी सृष्टी गोस्वामी (Srishti Goswami) 24 जानेवारी रोजी एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री होणार आहे. यावेळी विधानसभेच्या 120 क्रमांकाच्या कक्षेत बैठक घेण्यात येणार आहे. यासंदर्भात उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी मान्यता व सूचना दिल्या आहेत. उत्तराखंड बाल संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा उषा नेगी यांनी बुधवारी मुख्य सचिव ओमप्रकाश यांना एक पत्र पाठवलं होतं. या पत्रात त्यांनी म्हटलं होतं की, 24 जानेवारी रोजी मुलींच्या सबलीकरणासाठी एका हुशार विद्यार्थ्याला मुख्यमंत्र्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार, सृष्टी गोस्वामी उत्तराखंडच्या एक दिवसीय मुख्यमंत्री असतील. एका दिवसाच्या कार्यकाळात सृष्टी राज्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहे. यासाठी नियुक्त केलेले विभाग अधिकारी पाच मिनिटांत विधानसभेत आपले सादरीकरण देतील. (वाचा -Rajasthan: भरतपुर येथील महिलेला गेले 5 महिने कोरोना विषाणूचा संसर्ग; तब्बल 31 चाचण्या सकारात्मक आल्याने डॉक्टरही बुचकळ्यात)

दरम्यान, सृष्टीच्या पालकांनी सांगितले की, आज आम्हाला खूप अभिमान वाटतो. प्रत्येक मुलगी एक मैलाचा दगड साध्य करू शकते. फक्त त्यांना समर्थन देण्याची आवश्यकता आहे. तसेच एक दिवसाचा मुख्यमंत्री केल्यानंतर सृष्टी गोस्वामी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानले आहेत. (वाचा - Congress President Election: राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला जून 2021 मध्ये मिळणार नवा अध्यक्ष, CWC बैठकीत निर्णय)

हरिद्वारमधील बहादराबादमधील दौलतपूर गावात राहणारी सृष्टी गोस्वामी रुड़कीच्या बीएसएम पीजी कॉलेजमधून बीएससी एग्रीकल्चरचं शिक्षण घेत आहे. मे 2018 मध्ये बाल विधानसभेत बाल आमदारांच्या वतीने तिची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली होती. बाल विधानसभेमध्ये दर तीन वर्षांनी एका विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली जाते.