हंगामी अध्याक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) गांधी यांच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस (Congress) पक्षाला लवकरच एक नवा आणि पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीची (Congress Working Committee) एक बैठक आज पार पडली. या बैठकीबाबत काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल(K.C. Venugopal) यांनी माहिती दिली. काँग्रेस पक्षांत संघटनात्मक निवडणुकीत केंद्रीय निवड समितीने मान्यता दिल्याचे वेणुगोपल यांनी सांगितले. तसेच, सोनिया गांधी यांनी निश्चित करावे की ही निवडणूक कधी व्हावी असेही ठरले. तसेच, जून 2021 पर्यंत काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळेल असेही वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.
अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी मागणी केली आहे. मात्र राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद स्वीकारण्याबाबत दाखविलेली अनिच्छा, सोनिया गांधी यांचे प्रकृती अस्वास्थ्य आदी कारणांमुळे काँग्रेसमध्ये अध्यक्ष पदाचा शोध सुरु आहे. या आधीही अनेक काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा यासाठी पत्र लिहीले होते. लोकसभा निवडणूक 2019 नंतर राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर सोनिया गांधी यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष बनविण्यात आले. तेव्हापासून पक्षाचा कारभार सोनिया गांधी यांच्याकडेच आहे. आता पुन्हा एकाद पक्षातून अध्यक्षपदाची मागणी होत आहे. (हेही वाचा, Sonia Gandhi On TV Anchor's WhatsApp Chats: देशभक्तीची प्रमाणपत्रं वाटणाऱ्यांचे बुरखे फाटले; अर्णब गोस्वामी व्हायरल व्हाट्सअॅप चॅटवरुन सोनिया गांधी यांचा निशाणा )
Congress Working Committee has decided that there will be an elected Congress President by June 2021: KC Venugopal, Congress pic.twitter.com/JLcPjDHmB9
— ANI (@ANI) January 22, 2021
दरम्यान, या आधी रामचंद्र गुहा यांच्यासारख्या इतिहासकारांनी लेख लिहून आगोदरच स्पष्ट केले आहे की, गांधी कुटुंबीयांनी आता राजकारणापासून अलिप्त व्हायला हवे. गुहा यांच्या लेखावर मोठ्या प्रमाणावर चर्चाही झाली होती. काँग्रेस पक्षातूनही गांधी कुटुंबीयांबाहेरील व्यक्ती पक्षाध्यक्ष हवा अशी मागणी होऊ लागली आहे. अलिकडे असे चित्र निर्माण झाले आहे की, काँग्रेस पक्ष गांधी कुटुंबीयांबाहेरील व्यक्तीकडे अध्यक्षपद देऊ शकते.