Sonia Gandhi | (Photo Credit: Facebook)

देशभक्तीची प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचा बुरखा फाटला आहे, अशी जोरदार टीका करत राष्ट्रीय काँग्रेस (Congress) पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी 'रिपब्लिक टीव्ही' चे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या कथीत व्हॉट्सअॅप चॅटवरुन केंद्र सरकारव जोरदार हल्लाबोल चढवला आहे. काँग्रेस कार्यकारणीची (CWC) एक बैठक आज पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडताना म्हटले की, शेतकरी संघटनांसोबत केंद्र सरकारने अतिशय अहंकाराने चर्चा केली.

सानिया गांधी यांनी पुढे म्हटले की, एक आठवड्यात संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अधिवेशनात जनहीताचा मुद्दा विचारात घेऊन चर्चा होणे आवश्यक आहे. जनहिताच्या मुद्द्यावर केंद्र सरकार किती सहमत होते आहे हे पाहावे लागेल केंद्रीय कृषी कायद्यांचा उल्लेख कर सोनिया गांधी यांनी आरोप केला की, शेतकऱ्यांचे आंदोलन कायम आहे. सरकार शेतकऱ्यांना चर्चेच्या नावाखाली ताटकळत ठेवत आहे. अत्यंत असंवेदनशिलता दाखवत आहे. (हेही वाचा, Assembly Election 2021: नितीन राऊत, मुकुल वासनिक यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी; विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज; सोनिया गांधी यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय)

सोनिया गांधी यांनी पुढे असेही म्हटले की, हे तर स्पष्ट आहे की, केंद्र सरकारने कृषी कायदे अत्यंत घाईगडबडीने मंजूर केले. त्यावर विचार करायला वेळही दिला नाही. आम्ही या कायद्याचा विरोध करतो कारण हा कायदा शेतकऱ्यांच्या मूलभूत अधिकारांनाच धक्का लावतो.