या मान्सूनच्या मोसमात, हवाई प्रवाश्यांवर सवलतीचा वर्षाव होताना दिसत आहे. विस्तारानंतर आता स्पाइसजेटने (Spicejet Monsoon Sale) आपल्या मेगा मॉन्सून विक्री अंतर्गत ग्राहकांना मोठी सूट देण्यात आली आहे. या विक्री अंतर्गत देशांतर्गत हवाई भाडे फक्त 999 रुपयांपासून सुरू होत आहे. 999 रुपयांचे भाडे सर्वसमावेशक असून स्वतंत्रपणे कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. महत्वाचे म्हणजे, हैदराबाद-बेळगाव, बेळगाव-हैदराबाद, चेन्नई-हैदराबाद, चेन्नई-बंगळुरू अशा मार्गांचे भाडे 999 रुपयांपासून सुरू होत आहे. गुरुवारी, पूर्ण- सेवा वाहक विस्ताराने आपल्या नेटवर्कवर 48-तासांची 'मॉन्सून सेल' जाहीर केली होती. ज्यात 1099 रुपयांत एकतर्फी भाडे सादर केले आहे.
दरम्यान, स्पाईसजेटने असे म्हटले आहे की, ग्राहकांना मानसून सेल अंतर्गत मोफत उड्डाण व्हाऊचरमुळे सप्ताहिक सुट्टी किंवा इतर सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे.फ्री फाईट व्हाउचर्सची बुकिंगची वैधता 1000 रुपयांपर्यंत 1 जुलै ते 31 जुलै 2021 पर्यंत आहे. या तिकीटवर 1 ऑगस्ट ते 31 मार्च 2021 पर्यंत प्रवास करता येईल. याचपार्श्वभूमीवर एअरलाईन्स ग्रॉफर्स, एमफाइन, मेडीबडी, मोबिक्विक आणि द पार्क हॉटेल यांसारख्या ब्रॅंडने देखील ग्राहकांसाठी विशेष ऑफर सुरु केली आहे. महत्वाचे म्हणजे, स्पाईसजेटच्या थेट वेबसाईटवरून तिकीट बूक केल्यास ग्राहकांसाठी विशेष सूट उपलब्ध आहे. हे देखील वाचा- भारताचे IT Minister Ravi Shankar Prasad यांचं Twitter अकाऊंट अमेरिकन कायदा चा हवाला देत तासभर ब्लॉक
याशिवाय, प्रवासाला केवळ 149 रुपयांमध्ये त्यांच्या आवडीचे सीट बुक करता येणार आहे. याचबरोबर स्पाइसमॅक्स सुविधेचा लाभ फक्त 799 रुपयात मिळू शकेल. याअंतर्गत प्रवाशाला अतिरिक्त लेगरूम, प्राधान्य सेवा, जेवण आणि पेय पदार्थांचा अतिरिक्त लाभ मिळतो.
स्पाइसजेटच्या चीफ कमर्शियल ऑफिसर शिल्पा भाटिया म्हणाली, “आमच्या खास मेगा मॉन्सून सेल ऑफरमुळे तुम्हाला थोड्या प्रलंबीत शॉर्ट ब्रेकला नकार देण्याचे कोणतेही कारण सापडणार नाही. आमचे नवीन अविश्वसनीय भाडे आणि उत्तम ऑफर्ससाठी काळजीपूर्वक तयार केले गेले आहे. तसेच प्रवाशांना एक उत्तम प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करत आहे. आम्ही आमच्या प्रवाश्यांना खास सौदे आणण्यासाठी अनेक ब्रँडबरोबर भागीदारी केली आहे, जे त्यांच्या दैनंदिन खर्च आणि आरोग्य सेवांवरील वेळ आणि पैशाची बचत करण्यास मदत करतील. थेट घरगुती बुकिंगवरील सर्व एकतर्फी किरकोळ भाड्यांसाठी स्पाइसजेटची खास सवलत देण्यात आली आहे. सर्व चॅनेल्सवर मेगा मॉन्सून सेलची तिकिटे बुक केली जाऊ शकतात, असेही त्या म्हणाल्या आहेत.