स्पाइसजेटच्या (SpiceJet) पायलटच्या एका चुकीमुळे शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ आला असता. खरेतर, दिल्लीला (Delhi) जाणारे स्पाइसजेटचे विमान गेल्या आठवड्यात गुजरातमधील (Gujrat) राजकोट (Rajkot) येथून एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) राजकोटच्या अनिवार्य टेक-ऑफ परवानगीशिवाय उड्डाण केले. मिळालेल्या माहितीनुसार, नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) या घटनेबाबत स्पाइसजेटच्या वैमानिकांविरोधात चौकशी सुरू केली आहे. राजकोट विमानतळ संचालकांनी ANI ला सांगितले, "ही घटना 30 डिसेंबर 2021 रोजी घडली, वैमानिकांनी ATC राजकोटकडून कोणतीही परवानगी न घेता टेक-ऑफ केले." भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि DGCA यांना या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पाठवण्यात आला आहे.
Tweet
Delhi-bound SpiceJet flight takes off from Rajkot without ATC's clearance, probe initiated
Read @ANI Story | https://t.co/ZrESOjQFGM#SpiceJet #airtrafficcontrol pic.twitter.com/Pv35XZT1Ux
— ANI Digital (@ani_digital) January 2, 2022
विमान वेळापत्रकानुसार, SG-3703 दिल्लीसाठी टेक ऑफ करण्यासाठी वेळेवर होते, परंतु विमानाच्या वैमानिकांनी टेक-ऑफसाठी अनिवार्य परवानगी न घेता दिल्लीसाठी टेक ऑफ केल्याचे एटीसीला (ATC) आढळून आले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राजकोट एटीसीने वैमानिकांला विचारले की तुम्ही परवानगीशिवाय टेक-ऑफ कसे केले? ज्यावर पायलटने माफी मागितली आणि चूक झाल्याचे सांगितले. (हे ही वाचा विमान प्रवाशांसाठी खुशखबर! SpiceJet फक्त 1,122 रुपयांमध्ये देत आहे विमान प्रवासाची संधी, घ्या जाणुन.)
स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOPs) नुसार, प्रत्येक विमानाला उड्डाण करण्यापूर्वी ATC कडून टेक ऑफची परवानगी घेणे बंधनकारक आहे, धावपट्टी सुरक्षित आहे की नाही किंवा दुसरे विमान आपत्कालीन परिस्थितीत उतरत आहे की नाही याची माहिती घेणे गरजेचे आहे. या घटनेपासून वैमानिकांला तपास पूर्ण होईपर्यंत ‘ऑफ-ड्युटी’वर ठेवण्यात आले आहे.