Patna-Delhi SpiceJet Flight Fire: बिहारच्या पाटणामधून मोठी बातमी आली आहे. पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात आग लागली. विमानात अनेक प्रवासी होते. पटना विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग झाल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. विमानाच्या इंजिनला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन अलर्ट मोडवर आले. विमान उतरल्यानंतर प्रवाशांना विमानातून बाहेर काढले जात आहे.
पाटणाच्या एसएएसपीने मीडियाला सांगितले की, विमानाने उड्डाण करताच त्याच्या एका इंजिनमधून धूर निघताना दिसला. यानंतर विमानाने विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाच्या इंजिनमध्ये आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. (हेही वाचा - Nasal Covid Vaccine: खूशखबर! नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण; लवकरच लॉन्च होण्याची शक्यता)
विमानतळाबाहेर रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून, गरज भासल्यास तातडीने वैद्यकीय उपचार करता येतील. विमानातील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विमानतळावर अग्निशमन दलाच्या अतिरिक्त गाड्याही मागवण्यात आल्या आहेत.
#WATCH Patna-Delhi SpiceJet flight safely lands at Patna airport after catching fire mid-air, all 185 passengers safe#Bihar pic.twitter.com/vpnoXXxv3m
— ANI (@ANI) June 19, 2022
पाटणा डीएम चंद्रशेखर सिंह यांनी सांगितले की, पाटणा-दिल्ली फ्लाइटने टेक ऑफ होताच विमानतळावरून उड्डाण केले. त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या इंजिनला आग लागली. फुलवारी शरीफ परिसरातील लोकांनी उडत्या विमानातून धूर निघताना पाहिला, त्यानंतर तातडीने जिल्हा प्रशासनाला फोन करून माहिती दिली. प्रशासनाने तातडीने कारवाई करत विमानतळ प्रशासनाला कळवले. त्यानंतर विमान परत पाटणा विमानतळावर उतरवण्यात आले. स्थानिक लोकांनी उडत्या विमानात आग लागल्याचा व्हिडिओही बनवला, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.