Flights | Representational image (Photo Credits: pxhere)

Ethiopian Airlines Flight Emergency Landing: अदिस अबाबाला जाणाऱ्या इथिओपियन एअरलाइन्स (Ethiopian Airlines) च्या विमानातील कॉकपिट (Cockpit) मध्ये धूर आढळून आल्यानंतर बुधवारी पहाटे या विमानाचे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. इंडिया टू डेने दिलेल्या सुत्रांनुसार, बोइंग 777-8 विमानाने चालवलेल्या फ्लाइट ईटी 687 ने बुधवारी पहाटे 3 च्या सुमारास दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले.

विमानात बसलेल्या एका प्रवाशाने पीटीआयला सांगितले की, विमान टेक ऑफ केल्यानंतर लगेचच विमानतळावर परतले आणि विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. कॉकपिटमध्ये धुराचे लोट दिसल्याने अनेक प्रवासी घाबरले. या विमानत एकून 240 हून अधिक प्रवासी होते. (हेही वाचा -Air Akasa: दिल्ली-गोवा फ्लाइट दरम्यान पाळीव कुत्र्याचा पिंजरा उघडल्याने प्रवाशांमध्ये घबराट, महिलेविरुद्ध तक्रार दाखल)

दरम्यान, हे विमान इथिओपियन शहर अदिस अबाबा येथे जाणार होते. या घटनेनंतर एअरलाइनकडून कोणतही निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे आपत्कालीन लँडीग करण्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत.