Flight Cockpit Violation: एव्हिएशन रेग्युलेटर DGCA ने दुबई-दिल्ली फ्लाइट (Dubai-Delhi Flight) संबंधित सुरक्षेत त्रुटींसाठी एअर इंडियाला (Air India) 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी डीजीसीएने दुबई-दिल्ली फ्लाइट चालवणाऱ्या वैमानिकाचा परवानाही तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे. एअर इंडियाच्या दुबई-दिल्ली फ्लाइटदरम्यान एका पायलटने आपल्या महिला मैत्रिणीला कॉकपिट (Cockpit) मध्ये प्रवेश दिला होता. या प्रकरणी डीजीसीएने तपास पूर्ण होईपर्यंत संपूर्ण क्रूला काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.
डीजीसीएने सांगितले की, यावर्षी 27 फेब्रुवारीला एअर इंडियाचे विमान दिल्लीहून दुबईला जात होते. यादरम्यान, फ्लाइटच्या कमांडिंग पायलटने प्रवासी म्हणून प्रवास करणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला क्रूझदरम्यान कॉकपिटमध्ये प्रवेश करण्यास परवानगी दिली, जे डीजीसीए नियमांचे उल्लंघन होते. सुरक्षेच्या संवेदनशील समस्येवर तातडीने आणि प्रभावीपणे लक्ष न दिल्याने एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (हेही वाचा - Accident Video: मिनीबस उलटून 10 प्रवासी जखमी, अपघाताचा व्हिडिओ व्हायरल)
DGCA च्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी फ्लाइटच्या एका ऑपरेटिंग क्रू मेंबर्सने एअर इंडियाच्या सीईओकडे तक्रार केली होती. तथापि, तक्रारदाराने डीजीसीएशी संपर्क साधल्यानंतर कंपनीने या प्रकरणात कोणतीही तत्काळ कारवाई केली नाही.
Flight cockpit violation: DGCA fines Air India Rs 30 lakh, pilot's license suspended for 3 months
Read @ANI Story | https://t.co/MowjqL1djC#DGCA #AirIndia #CivilAviation pic.twitter.com/Nas0wbXPJV
— ANI Digital (@ani_digital) May 12, 2023
कॉकपिट म्हणजे काय?
कॉकपिट हा विमानाचा भाग आहे, जो पायलट आणि सह-वैमानिकाद्वारे चालवला जातो. सोप्या भाषेत समजल्यास पायलटच्या केबिनला कॉकपिट म्हणतात. येथे पायलट आणि सहवैमानिक वगळता कोणीही प्रवेश करू शकत नाही.