
Singrauli Road Accident: मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात मोटारसायकल विजेच्या खांबाला धडकल्याने तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा मुख्यालयापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या सरौंधा गावाजवळ सोमवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली. जियावन पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेंद्र पाठक यांनी सांगितले की, मोटारसायकलस्वाराचा वाहनावरील ताबा सुटला, त्यानंतर वाहन विजेच्या खांबाला धडकले. हे देखील वाचा: Pune: हिवाळ्यातील थंडीपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कात्रज प्राणीसंग्रहालयात बसवण्यात आले हीटर