England vs India, 1st Test Day 2 Live Streaming In India: भारतविरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटीचा दुसरा दिवस; लाईव्ह सामना कसा पहाल?

भारताची इंग्लंडविरुद्ध मालिका पाच सामन्यांची असेल. मालिकेतील पहिली कसोटी लीड्समध्ये, दुसरी कसोटी बर्मिंगहॅममध्ये, तिसरी कसोटी लॉर्ड्समध्ये, चौथी कसोटी मँचेस्टरमध्ये आणि पाचवी कसोटी लंडनमध्ये खेळवली जाईल.

England vs India, 1st Test Day 2 Live Streaming In India: भारतविरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटीचा दुसरा दिवस; लाईव्ह सामना कसा पहाल?
IND vs ENG (Photo Credit- X)

England National Cricket Team vs India National Cricket Team, 1st Test Match 2025 Day 2 Live Streaming And Telecast: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारत राष्ट्रीय क्रिकेट संघामधील (IND vs ENG) पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 जूनपासून खेळला जात आहे. दोन्ही संघांमध्ये लीड्समधील हेडिंग्ले येथे हा सामना खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे भारतीय फलंदाजांच्या नावावर होता. या कसोटी मालिकेत इंग्लंडची कमान बेन स्टोक्सच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. दोन्ही संघांमधील कसोटी मालिका 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याला भारतीय फलंदाजांकडून चोख उत्तर दिल जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबेपर्यंत 85 षटकांत 3 गडी बाद 359 धावा झाल्या. कर्णधार शुभमन गिल 127* आणि यष्टिरक्षक ऋषभ पंत 65* धावांवर नाबाद परतला.

भारताने दिवसाची सुरुवात उत्तम पद्धतीने केली. सलामीवीर यशस्वी जयस्वालने 158 चेंडूत 101 धावांची आकर्षक शतकी खेळी केली. ज्यामध्ये त्याने 16 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. त्याने प्रथम केएल राहुल (42) सोबत 91 धावांची भागीदारी केली आणि नंतर शुभमन गिल सोबत 130 धावांची उत्तम भागीदारी केली. तथापि, बेन स्टोक्सने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत इंग्लंडला पुनरागमनाची काही आशा दिली, परंतु कर्णधार गिल आणि पंत यांच्या जोडीने ती आशा पुन्हा हिरावून घेतली.

शुभमन गिलने जबाबदारीने फलंदाजी केली आणि 175 चेंडूत 127 धावांची कर्णधारपदाची खेळी केली. ज्यामध्ये त्याने 16 चौकार आणि एक षटकार मारला. दुसरीकडे, ऋषभ पंतने आक्रमक दृष्टिकोन बाळगला आणि 102 चेंडूत 65 धावा केल्या. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 138 धावांची अतूट भागीदारी झाली आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, ब्रायडन कार्स आणि स्टोक्स यांनी 1-1 बळी घेतले, परंतु ख्रिस वोक्स (19 षटके, 89 धावा), जोश टोंग (16 षटके, 75 धावा) आणि शोएब बशीर (21 षटके, 66 धावा) यांना कोणताही प्रभाव पाडता आला नाही.

ही मालिका पाच सामन्यांची असेल, मालिकेतील पहिला कसोटी सामना 20 ते 24 जून दरम्यान लीड्समध्ये, दुसरा कसोटी सामना 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान बर्मिंगहॅममध्ये, तिसरा कसोटी सामना 10 जुलै ते 14 जुलै दरम्यान लॉर्ड्समध्ये, चौथा कसोटी सामना 23 ते 27 जुलै दरम्यान मँचेस्टरमध्ये आणि पाचवा कसोटी सामना 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान लंडनमध्ये खेळला जाईल.

लाईव्ह टेस्ट कुठे पाहू शकता?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील पाचही सामने टीव्हीवर थेट पहायचे असतील, तर आम्ही तुम्हाला सांगतो की लाईव्ह टेस्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे आहे?

सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे लाईव्ह टेलिकास्टचे अधिकार आहेत पण भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar वर असेल. मालिकेसाठी दोघांमध्ये करार झाल्याची बातमी आधी आली होती.

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2025 10:09 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).