Kharghar Mercedes Scooter Accident: खारघर येथे मर्सिडीज कारची स्कूटरला धडक; विवाहिता ठार; 19 वर्षांच्या मुलीवर गुन्हा दाखल

Mercedes-Benz Crash Kharghar: नवी मुंबई येथील खारघर येथे मर्सिडीज कारच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. 19 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थिनीविरोधात खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Kharghar Mercedes Scooter Accident: खारघर येथे मर्सिडीज कारची स्कूटरला धडक; विवाहिता ठार; 19 वर्षांच्या मुलीवर गुन्हा दाखल
Kharghar Mercedes Scooter Accident | (Photo credit: archived, edited, representative image)

Navi Mumbai Road Accident: नवी मुंबई येथील खारघर (Kharghar Accident) परिसरात असलेल्या, भरधाव वेगात येणाऱ्या मर्सिडीज-बेंझ कारने (Mercedes-Benz Crash Kharghar) स्कूटीवर जाणाऱ्या पती-पत्नीस जोरदार धडक दिली. हा अपघात हिरानंदानी पुलाजवळ बुधवारी रात्री अंदाजे 8:45 च्या सुमारास सायन-पनवेल महामार्गावर घडला. या घटनेमध्ये रेखा यादव (50) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे पती गोपाल दत्तू यादव (54) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर खारघर पोलिसांनी (Kharghar Police) तातडीने कारवाई करत एका तरुणीस ताब्यात घेतले असून, चौकशी सुरु केली आहे. तरुणीची ओळख तिथी सिंग (वय-19) अशी झाली असून, ती अभियांत्रिकीची विद्यार्थिनी असल्याची प्राथमिक माहिती आहे. खारघर पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल आहे. पोलीस अधिक चौकशी आणि तपास करत आहेत.

पत्नीचा मृत्यू, पती जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू पनवेलची रहिवासी असलेली तिथी सिंग सिंह ही अभियांत्रिकीची विद्यार्थीनी बेलापूर येथे मैत्रिणीला भेटून पनवेलकडे परतत होती. या वेळी ती खारघर येथून अतिशय भरधाव आणि बेदरकारपणे आपली मर्सिडीज-बेंज ही आलीशान हाकत होती. यादव दाम्पत्य दुचाकीवरून पनवेलच्या दिशेने जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या तिथीच्या मर्सिडीज कारने त्यांच्या स्कूटरला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर दूर फेकले गेले. रेखा यादव यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पतीच्या पाय, हात आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाल्या. त्यांना तातडीने MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा, Kharghar Road Accident: ट्रकने स्कूटरला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू, वाहन चालक फरार, खारघर महामार्गावरील अपघात)

खारघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक सूर्ये यांनी सांगितले, आरोपी तरुणी बेलापूरला मैत्रिणीकडे गेली होती आणि परतत असताना हा अपघात घडला. या प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. पोलिस सध्या घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासत असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहेत. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आलिशान कार बेदरकारपणे चालवून अपघातास कारण ठरणाऱ्या धनदांडग्यांच्या मुलांचे प्रमाण वाढले आहे. धक्कादायक म्हणजे या आधी घडलेल्या अशा अनेक प्रकरणांमध्येबहुतांश मुले ही अल्पवयीन आहेत किंवा त्यांनी वयाची 18 वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. अशा वयाच्या विषीतील तरुणांईकडून अपघाताचे प्रमाण वाढल्याने सामाजिक चिंता व्यक्त केली जात आहे. खास करुन अपघात घडल्यानंतर पीडितांना मदत करण्याऐवजी अनेकदा ही धनदांडग्यांची मुले घटनास्थळावरुन निघून जातात. त्यामुळेही अनेकदा पीडितास वेळेत मदत मिळत नाही आणि ते दघावण्याचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 15, 2444 05:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).