राजस्थानमधल्या (Rajasthan) बारमेर (Barmer) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला जिवंत जाळत एका मांत्रिकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याच्या घरामधून तंत्रविद्येचे अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या मांत्रिकाची पार्श्वभूमी काय होती? तसेच तसेच या मांत्रिकाला गावातील कोणते नागरिक मदत करत होते, याचाही पोलीस शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मांत्रिकाचे नाव भील आहे आणि तो मुळचा पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या बाखासर या गावातील रहिवाशी आहे. परंतु, हा मांत्रिक गेल्या दोन वर्षांपासून या गावात राहत असल्याची माहिती मिळत आहे. एवढेच नव्हेतर तो राहत असलेल्या घरामध्ये त्याने मांत्रिक समाधी केंद्र बनवले होते. या गावातल्या एका मांत्रिकाने आधी 10 वर्षांच्या मुलीला जाळले आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे. संबंधित मुलीला जाळल्यानंतर त्याने आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. हे देखील वाचा- धक्कादायक! 9 वी मधील विद्यार्थिनीवर 8 जणांचा 13 दिवस बलात्कार; आरोपींना अटक, चार जण अल्पवयीन
जादूटोणा, भोंदूगिरी याला बळी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सर्वसामान्य जनता अजूनही या भोंदूबाबांना बळी पडत आहे. या प्रकारचे गुन्हे हे दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. यात बळी पडणाऱ्यांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण अधिक आहे. हे सर्व अघोरी प्रकार बंद व्हावेत यासाठी कायदा करावा म्हणून आंदोलने झाली. सरकारने कायदा देखील केला. मात्र, तरीही अशाप्रकारच्या बातम्या सतत आपल्या कानावर पडत असतात.