धक्कादायक! 9 वी मधील विद्यार्थिनीवर 8 जणांचा 13 दिवस बलात्कार; आरोपींना अटक, चार जण अल्पवयीन
Rape | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) बलरामपुर जिल्ह्यामधील राजपुरच्या भागात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. इथे एका अल्पवयीन मुलीवर 8 जणांनी 15 दिवस सामुहिक बलात्कार (Gang Rape) केला आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या भागात खळबळ उडाली आहे. तसेच तक्रारीनंतर स्थानिक पोलिस स्टेशनने सर्व आरोपींना अटक केली व त्यांची चौकशी सुरू आहे. या सामूहिक बलात्काराच्या घटनेमधील 8 आरोपींपैकी 4 आरोपी अल्पवयीन असल्याचेही समोर आले आहे. स्थानिक पोलिस ठाण्यानुसार पीडित मुलगी 9 वीची विद्यार्थिनी आहे. कुटुंबातील लोकांना काहीच कल्पना न देता ती 20 नोव्हेंबर रोजी तिच्या मैत्रिणींना भेटायला अंबिकापुर येथे गेली होती.

इथेच तिची सागर नावाच्या एका ओळखीच्या युवकाशी भेट झाली. सागर या मुलीला आपल्या मित्राच्या रूमवर घेऊन गेला, तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. नंतर या युवकाने मुलीला त्याच्या 8 मित्रांच्या स्वाधीन केले, ज्यांनी तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. बलरामपूरचे पोलिस अधीक्षक रामकृष्ण साहू यांनी सांगितले की, ‘20 नोव्हेंबर रोजी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी त्यांची मुलगी 20 नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर 5 डिसेंबरला ही मुलगी घरी परत आली. दुसर्‍याच दिवशी तिला तिचे स्टेटमेंट नोंदवण्यासाठी तिच्या पालकांनी राजपूर पोलिस स्टेशनमध्ये नेले. (हेही वाचा: सामूहिक बलात्कार पीडित युवतीला पाजले विष, उपचारादरम्यान मृत्यू; जळगाव येथील थरारक घटना)

मुलीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सर्व 8 आरोपींना अटक केली आहे. मुलीने सांगितले की, 13 दिवसांत 8 लोकांनी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 363 (अपहरण), 376 (बलात्कार) आणि 120 बी (गुन्हेगारी कट रचणे) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती साहू यांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.