बिहारच्या (Bihar) सीतामढी (Sitamarhi) जिल्ह्यात एका कोचिंग इन्स्टिट्यूटच्या 18 वर्षीय विद्यार्थ्याची चाकू भोसकून हत्या (Student Stabbed to Death) करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (25 सप्टेंबर) संध्याकाळी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृताचे कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये समोरच्या बाकावर बसण्यावरून अन्य काही विद्यार्थ्यांशी मोठा वाद झाला होता, असा आरोप त्याच्या कुटुंबातील नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी एक पथकाची निवड केली असून लवकरच याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
अनमोल भारती असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. दरम्यान, अनमोलचे कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये ज्या विद्यार्थ्यांसोबत वाद झाला, त्यांना त्याला भेटायला बोलावून घेतले. त्यावेळी अनमोलचा चुलत भाऊ प्रियांशु हा त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी त्याच्यासोबत गेला होता. मात्र, त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अनमोलच्या पोटात चाकू भोसकला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनमोलला प्रियांशु जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Uttar Pradesh Crime: यूपीमध्ये अनोखळी व्यक्तीशी बोलल्याबद्दल 35 वर्षीय महिलेला सासरच्या लोकांकडून झाडाला बांधून मारहाण
सीतामढी जिल्हा एसडीपीओ रमाकांत उपाध्याय म्हणाले की आम्ही प्रियांशुच्या वक्तव्यावर एफआयआर नोंदवला आहे. उपाध्याय म्हणाले की, आरोपींना पकडण्यासाठी आम्ही एक टीम तयार केली आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.