Narendra Modi Announces Next Man Ki Baat On 30th June (Photo Credits: File Image)

भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी आज चौथ्यांदा मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आज सायंकाळी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत नेता निवड झाल्यानंतर रात्री 9 वाजता त्यांचा शपथविधी झाला आहे. यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Narendra Modi) त्यांचे कौतूक केले आहे. काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांच्या बंडामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पंधरा दिवसांपासूनच डळमळीत झाले होते. काँग्रेसमधील ज्योतिरादित्य यांच्यासह 22 आमदारांनी आमदारकीचे राजीनामा दिल्याने कमलनाथ सरकार अल्पमतात आले. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. कमलनाथ सरकारला प्लोर टेस्ट करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. आदेशानंतर सभापतींनी सर्व 16 आमदारांचा राजीनामा मंजूर केला आणि फ्लोअर टेस्टपूर्वी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पक्षाला रामराम करीत भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या 22 समर्थकांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर 22 मार्च रोजी कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर, दुसरीकडे भाजपाची सदस्य संख्या वाढल्याने सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ असल्याने भाजपाचे सरकार बनणार हे निश्चित झाले होते. नवे सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांनी कमलनाथ यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्र्याची जबाबदारी सोपवली होती. आता मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर शिवराज सिंह चौहान विराजमान झाले आहेत. यानंत नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवराजसिंह हे एक सक्षम आणि अनुभवी नेते आहेत. ज्यांनी राज्याच्या विकासासाठी अत्यंत्य महत्वाचा वाटा उचलला आहे. राज्याला प्रगतीच्या उंचीवर नेल्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा, या आशायाचे नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले आहे. हे देखील वाचा- कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी गौतम गंभीर यांचा मदतीचा हात; खासदार निधीतून दिल्लीतील सरकारी रुग्णालयास देणार 50 लाख रुपयांचा निधी

ट्वीट-

देशात गेल्या अनेक वर्षापासून राज्य करत असलेला काँग्रेसचा पक्ष सध्या संघर्ष करत असताना दिसत आहे. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला होता. मात्र, जोतिरादित्य सिधिया यांनी केलेल्या राजकारणाचे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.