प्रतिकात्मक फोटो ( Photo Credit: Pixabay )

मुल्लानपूर (Mullanpur) गरीबदास पोलिसांनी (Garibdas Police) एका महिलेला घरात मदतनीस म्हणून काम करत असलेल्या घरातून 25 लाख रुपये रोख आणि 15 तोळे सोने चोरल्याप्रकरणी अटक (Arrested) केली आहे. आरोपी गेल्या 10 वर्षांपासून घरात काम करत असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी सांगितले की त्यांनी एफआयआर नोंदवल्यानंतर तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपा कुमारी असे आरोपीचे नाव असून ती मूळची उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील बुलंद शहर येथील आहे. पोलिसांनी सांगितले की, दीपा मुल्लानपूर येथील फूटहिल्स सोसायटीत राहत होती आणि रेखा चंद्रा यांच्या घरी काम करत होती.

रेखाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिने तिच्या मुलीच्या लग्नासाठी 25 लाख रुपये रोख आणि सुमारे 15 तोळे सोने घरात ठेवले होते. तक्रारदाराने पोलिसांना सांगितले की, त्यांची मोलकरीण दीपा कुमारी गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत होती. 14 ऑक्टोबर रोजी ती कोणालाही न सांगता घरातून अचानक गायब झाली. हेही वाचा Diwali 2022: बॉल समजून फटाक्याला लावला हात, 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

फिर्यादीने पोलिसांना पुढे सांगितले की, नंतर तिच्या घरी तपासणी केली असता तिला रोख रक्कम आणि सोने गायब आढळले. रेखाने तिच्या तक्रारीत पुढे असा आरोप केला आहे की, दीपानेच ही चोरी केल्याचा तिला संशय होता, कारण ती घरात एकटीच होती ज्याला रोकड आणि सोने असल्याची माहिती होती. तक्रारीवर कारवाई करत मुल्लानपूर पोलिसांनी दीपा कुमारीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 381 (चोरी) अन्वये गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक करण्यात आली.