Jammu Kashmir: शोपियां जिल्ह्यातील Hadipora भागात सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांना कंठस्नान
Indian Army (Photo Credits- PTI)

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. प्राप्त माहितीनुसार, शोपियां जिल्ह्यातील (Shopian District)हदीपोरा (Hadipora) भागात सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना ठार केले आहेत. रविवारी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व दहशतवादी अल-बद्र (Al-Badre) या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. शनिवारी रात्री दहशतवादी आणि सुरक्षा दलातील चकमकीस सुरूवात झाली. ताज्या माहितीनुसार, याठिकाणी अजूनही शोध मोहीम सुरू आहे.

वृत्तसंस्था एएनआयने काश्मीर झोन पोलिसांच्या (Kashmir Zone Police) हवाल्याने सांगितले की, नव्याने भरती झालेल्या दहशतवाद्याला शरण (Surrender) जाण्यासाठी पोलिस आणि सुरक्षा दलांनी प्रामाणिक प्रयत्न केले. त्यांच्या पालकांनीही त्यांना आत्मसमर्पणसाठी विनंती केली. मात्र, इतर दहशतवाद्यांनी त्याला शरण जाण्यास परवानगी दिली नाही. (वाचा - Encounter in Awantipora: जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 2 दहशतवादी ठार)

यापूर्वी पोलिसांनी सांगितले होते की, जम्मू-काश्मीरच्या शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात दोन चकमकींमध्ये सुरक्षा दलाने दहशतवादी संघटनेचा अंसार गजवातुल हिंदचा प्रमुख इम्तियाज अहमद शाह यांच्यासह सात दहशतवाद्यांना ठार मारले. दरम्यान, एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले होते की, शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले होते, तर पुलवामा जिल्ह्यातील त्राळ भागात नौबाग येथे झालेल्या चकमकीत दोन अतिरेक्यांना कंठस्थान घालण्यात आलं आहे.