IAF Airmen Recruitment 2020: भारतीय वायुसेनेमध्ये काम करण्याची इच्छा असणार्या तरूणांसाठी Airmen पदासाठी सध्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू आहे. Airmen च्या Group ‘X’आणि Group ‘Y’या पदांसाठी ही नोकरभरती होणार असून त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन airmenselection.cdac.in या अधिकृत वेबसाईटवर 20 जानेवारीपर्यंत करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. Sarkari Naukri: 12 वी पास असणाऱ्यांसाठी खुशखबर, इंडियन कोस्ट गार्ड येथे नोकरीची संधी.
Airmen च्या Group ‘X’आणि Group ‘Y’या पदासाठी होणार्या नोकरभरतीमध्ये अर्जदारांना चार टप्प्यांमधून जावं लागणार आहे. यामध्ये लेखी परीक्षा, अडेप्टेबिलिटी टेस्ट, कागदपत्र दाखल करणं आणि त्याचं व्हेरिफिकेशन अशा विविध टप्प्यामधून जावं लागणार आहे. या सार्याच्या अंती योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. दरम्यान यासाठी परीक्षा केंद्र मुंबई, दिल्ली, भोपाळ, चैन्नई प्रमाणे देशभर आहेत. इथे पहा या पदांसाठीचे पात्रता निकष आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी.
दरम्यान एअरमॅनच्या पदभरतीसाठी ट्रेनिंग दरम्यान स्टायपेंट दिला जाणार आहे. यामध्ये किमान 14,000 ते 33,000 इतका पगार मिळू शकतो. दोन्ही पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता निकषांनुसार उमेदवाराची निवड होणार आहे. त्यामुळे इच्छित उमेदवाराने अर्ज दाखल करण्यापूर्वी संबंधित पदासाठी आवश्यक असणारे निकष वाचून योग्य पदासाठी अर्ज दाखल करावा.