Bengaluru Scientist Attacked (PC - Twitter/@lambashish)

Bengaluru Road Rage Case: सध्या संपूर्ण देश मून मिशन अंतर्गत चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चे यशस्वी लँडिंग करून इतिहास रचणाऱ्या बेंगळुरू (Bengaluru) येथील इस्रोच्या मुख्यालयातील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहे. तर दुसरीकडे, एका वैज्ञानिकावर 4 अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना बंगळुरूमधूनच समोर आली आहे. हल्लेखोरांनी वैज्ञानिकाच्या गाडीचा पाठलाग करून कारचे विंडशील्ड आणि मागील काचही फोडली.

ही घटना 24 ऑगस्टच्या मध्यरात्रीची असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित शास्त्रज्ञ एका नामांकित संस्थेत काम करतात. मिळालेल्या माहितीनुसार, 4 अज्ञात हल्लेखोरांनी बेंगळुरूमधील एका प्रतिष्ठित संस्थेतील शास्त्रज्ञाचा दुचाकीवरून पाठलाग केला आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या कारची विंडशील्ड आणि मागील काच फोडली. शास्त्रज्ञ आशुतोष लांबा यांनी ट्विटरवर (X) आपला भयानक अनुभव शेअर केला असून या घटनेचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. (हेही वाचा - Aditya-L1 Mission: आदित्य-L1 मिशनच्या प्रक्षेपणाची तयारी सुरू; वाहनांची अंतर्गत तपासणी पूर्ण, ISRO ने शेअर केले खास फोटोज, See)

इस्रोचे शास्त्रज्ञ आशिष लांबा यांनी सांगितले की, आरोपी माझ्या कारजवळ आला आणि भांडू लागला. त्याने माझ्या कारला दोन वेळा लाथ मारली. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत दोषीवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. बेंगळुरू शहर पोलिसांनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर टिप्पणी करताना सांगितले की, या घटनेची नोंद घेण्यात आली असून संबंधित पोलिस अधिकाऱ्याला घटनेची माहिती देण्यात आली आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञाला सामोरे जावे लागलेल्या घटनेवर सोशल मीडिया यूजर्सही प्रतिक्रिया देत आहेत. दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.