SC Stops ASI Survey Of Gyanvapi: ज्ञानवापी प्रकरणासंदर्भात (Gyanvapi Case) मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 26 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ASI सर्वेक्षणाला स्थगिती दिली आहे. 26 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ज्ञानवापी मशीद परिसराचे ASI सर्वेक्षण करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 26 जुलैपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार नाही. दरम्यान, मशीद समिती उच्च न्यायालयात जाणार आहे.
तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना एएसआय सर्वेक्षणादरम्यान उत्खननाचे काम करत आहे की नाही याबाबत सूचना घेण्यास सांगितले. यावर सॉलिसिटर जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, आता खोदकाम होत नाही. वैज्ञानिक सर्वेक्षण सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण करण्यात येत आहे. (हेही वाचा - Suicide Caught on Camera in Hyderabad: चालत्या बस समोर उडी घेत तरुणाची आत्महत्या, धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर)
दरम्यान, मुस्लीम पक्षाने म्हटले आहे की, अशाच प्रकरणात एएसआय सर्वेक्षणाच्या आदेशाला आधीच स्थगिती देण्यात आली आहे, तर दुसऱ्या प्रकरणात एएसआय सर्वेक्षणाला परवानगी कशी दिली जाऊ शकते. मुस्लिम बाजूच्या वतीने म्हटलं आहे की, एवढी घाई कशासाठी करण्यात येत आहे? 15 व्या शतकापासून या ठिकाणी मशीद आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
एएसआयने आज सकाळी 7 वाजल्यापासून उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी कॅम्पसचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 30 सदस्यांच्या टीमद्वारे हे सर्वेक्षण केले जात आहे. एएसआयने सर्वेक्षणाचा अहवाल 4 ऑगस्टपर्यंत सादर करायचा आहे. शनिवारी 22 जुलै रोजी न्यायालयाने जागेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. ज्या अंतर्गत काशी विश्वनाथ मंदिराजवळील माँ शृंगार गौरी-ज्ञानवापी मशीद प्रकरणातील वादग्रस्त भाग वगळता संपूर्ण ज्ञानवापी संकुलाची पुरातत्व तपासणी केली जाईल. मुस्लीम पक्षाने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून सर्वेक्षणाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.