एनपीआरचा एनसीआरशी काहीही संबंध नाही- अमित शाह
Amit Shah| Photo Credits: Twitter /ANI

नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (CAA) विरोधात देशाभरातून विरोध केला जात आहे. यामुळे नागरिकांना  राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) आणि  राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NCR) संदर्भात भारताचे गृह मंत्री आणि भाजप (BJP) नेते अमित शाह (Amit Shah) यांची नुकतीच मुलाखत पार पडली आहे. दरम्यान, त्यांनी  राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी  यांच्या संबधित माहिती देण्यासाठी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन भारतीय नागरिकांचा गैरसमज दूस करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि  राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही, असे विधान अमित शाह यांनी केले आहे. तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीची प्रक्रिया काँग्रेसच्या काळात सुरु झाली होती,असेही अमित शाह मुलाखती दरम्यान म्हणाले आहेत.

नुकतीच अमित शाह यांची राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी यासंदर्भात सामन्य जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, अशी माहिती अमित शाह यांनी दिली. तसेच राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या कामात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचा वापर केला जाणार नाही, असेही अमित शाह म्हणाले आहेत. हे देखील वाचा- मुख्यमंत्र्यांवर सतत निशाणा साधणा-या ट्रोलर्सला आदित्य ठाकरे यांनी अशा शब्दांत दिले प्रत्युत्तर

एएनआयचे ट्वीट-

दरम्यान, अमित शाह यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात अंदोलन करणाऱ्या नागरिकांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केले. महत्वाचे म्हणजे, नागरिकत्व दुरूस्ती कायद्याचा भारतीय नागरिकांना कोणताही धोका उद्भवणार नाही. नागरिकत्व दुरूस्ती कायदा नागरिकत्व देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. यामुळे काही काळापासून भारतात असणाऱ्या नागरिकांच्या नागरिकत्वावर कोणताही फरक पडणार नाही, असेही अमित शाह म्हणाले आहेत.