NIOS Recruitment 2021: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 115 रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू
NIOS (Pic Credit - Twitter)

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने संचालक, सहसंचालक, कनिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफरसह विविध पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवार nios.ac.in/vacancy येथे NIOS च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज (Apply online) करू शकतात. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Education) अंतर्गत स्वायत्त संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील एकूण 115 पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये (NIOS Recruitment 2021) उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 10 ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिकृत अधिसूचना तपासावी.

 जनरल आणि ओबीसी वर्गासाठी 750 रुपये ग्रुप बी आणि सी पोस्ट जनरल आणि ओबीसीसाठी 500 रुपये ग्रुप ए तर बी एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस वर्गासाठी 250 रुपये,  ग्रुप सी एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस 150 रुपये भरावे लागतील. याशिवाय प्रक्रिया शुल्क म्हणून 50 रुपये भरावे लागतील. हेही वाचा JEE Main Result 2021: जेईई मेन निकाल जाहीर, 100% गुण मिळवत 18 जणाना रँक 1 मध्ये, महाराष्ट्रातील अथर्व अभिजीत तांबट याचाही समावेश

रिक्त पदांचा तपशील या रिक्त पदासाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज करावा लागेल आणि अधिकृत वेबसाइट nios.ac.in ला भेट देऊन सर्व उपयुक्त माहिती भरावी लागेल. यासाठी उमेदवाराचे कमाल वय 27 ते 56 वर्षे असावे. यामध्ये, मुलाखत आणि परीक्षेतील कामगिरीनुसार या रोजगारात उमेदवाराची निवड केली जाईल. या रिक्त जागेत वेगवेगळ्या पदांसाठी विविध पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या बारावी उत्तीर्ण, पदवीधर, पदव्युत्तर आणि पदविकाधारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. पात्रतेच्या संपूर्ण तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध सूचना पहा.

रिक्त पदांची संख्या - 115 पदे

संचालक - 01

सहसंचालक - 01

उपसंचालक - 01

सहाय्यक संचालक - 02

लेखा अधिकारी - 01

शैक्षणिक अधिकारी - 17

संशोधन आणि मूल्यमापन अधिकारी - 01

विभाग अधिकारी - 07

सहाय्यक अभियंता - 01

हिंदी अधिकारी - 01

सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी - 01

ईडीपी पर्यवेक्षक - 37

कनिष्ठ अभियंता - 01

सहाय्यक - 04

आशुलिपिक - 03

कनिष्ठ सहाय्यक - 36