Image used for representational purpose

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सांखणताल गावात एका महिलेने आपल्या पतीचा दोरीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर 24 तासानंतर स्वत:च स्थानिक पोलिसांना फोनकरून माहिती दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले होते. आपल्या पतीला दारूचे व्यसन होते. तसेच दारू पिल्यानंतर तो दररोज आपल्याशी भांडण करायचा, याला वैतागून हे पाऊल उचलले, असे कबूली पत्नीने दिली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

निर्मल सिंह असे 34 वर्षीय हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. निर्मलने 2011 मध्ये आरोपी नीरज हिच्यासोबत विवाह झाले होते. निर्मल याला दोन भाऊ होते आणि हे तिघेही वेगवेगळे राहत होते. निर्मल हा सर्वात लहान असून तो अनिल गाव येथे आपली पत्नी नीरज आणि आपल्या वडिलांसह शेतात राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार निर्मल आणि नीरज यांच्यात दररोज भांडण होत असे. परंतु, मंगळवारी निर्मलचा मृतदेह घरात पडलेला दिसला गावकऱ्यांना दिसला. तसेच त्याच्या गळ्यावर दोरीने निशाण देखील होते. वडिलांना विचारले असता निर्मल आणि त्याच्या पत्नीत 20 सप्टेंबर रोजी भांडण सुरु होते, अशी माहिती मृताच्या भावाने पोलिसांना दिली आहे. हे देखील वाचा- Cyber Crime In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील सामान्य कुटुंबातील मुलीच्या खात्यावर जमा झाले 10 कोटी रुपये

महत्वाचे म्हणजे, मृतक हा निर्मल शेती करण्याबरोबरच पशुपालक होता. 2011 मध्ये लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. मोठी मुलगी भावना (7) आणि मुलगा राहुल (5) आहे. आरोपी नीरजने 20 सप्टेंबर रोजी रात्री पती निर्मलचा दोरीने गळा आवळून खून केल्यावर मृतदेह आपल्या पलंगावर लपविला. दुसर्‍या दिवसापर्यंत कोणालाही हत्येची कल्पना आली नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी मृतदेहाचा दुर्गंध येऊ लागला. त्यानंतर आरोपीने स्वत: पोलिसांना फोनकरून या हत्येबाबत माहिती दिली.