Rajasthan Panchayat Election Results 2021: पंचायत समिती सदस्य निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय; भाजपसह इतर पक्षांना किती जागा मिळाल्या? घ्या जाणून
BJP-Congress | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राजस्थानच्या (Rajasthan) सहा जिल्ह्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (Panchayat committee) सदस्यांच्या मतांची मतमोजणी शनिवारी सकाळी सुरू झाली. जिथे सत्ताधारी पक्ष काँग्रेसने (Ruling Party Congress) पंचायत समिती सदस्यांच्या 1564 जागांपैकी सर्वाधिक 598 जागा जिंकल्या आहेत. तर, भाजपला (Bharatiya Janata Party) 490 जागेवर विजय मिळवता आला आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून सबंधित जिल्ह्या मुख्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली आणि अजूनही सुरू आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने जोधपूरमध्ये जिल्हा परिषद सदस्याची एक जागाही जिंकली आहे. शनिवारी दुपारी 3.30 पर्यंत 1389 जागांसाठी निकाल जाहीर झाले. त्यांच्या मते, सहा जिल्ह्यातील 78 पंचायत समित्यांच्या 1564 जागांपैकी कॉंग्रेसने 598 जागा जिंकल्या, भाजप 490, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष (RLP) 39, बहुजन समाज पार्टी (BSP)10 जागा जिंकल्या आहेत. याचवेळी 250 जागांवर अपक्ष विजयी झाले होते. जिल्हा परिषद सदस्यांच्या एकूण 200 जागांसाठी मतदान झाले होते. त्यात जोधपूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. हे देखील वाचा- चालत्या ट्रेनमध्ये चक्क अंडरवेअरवर फिरताना आढळले JDU आमदार Gopal Mandal; ट्रोल झाल्यानंतर दिले 'हे' स्पष्टीकरण

राज्यातील जयपूर, जोधपूर, भरतपूर, सवाई माधोपूर, दौसा आणि सिरोही या सहा जिल्ह्यांत 200 जिल्हा परिषद सदस्य, 1564 पंचायत समिती सदस्य, सहा जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि 78 प्रमुख, उप-प्रधान यांना तीन टप्प्यांत मतदान झाले आहे. यापैकी एक जिल्हा परिषद सदस्य आणि 26 पंचायत समिती सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.