
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' (Mann Ki Baat) पूर्वी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आव्हान केले आहे. जर पंतप्रधान मोदी यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी रोजगार आणि शेतकऱ्यांविषयी बोलून दाखवावे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करून लिहिलं आहे की, "हिंमत असेल तर करा #KisanKiBaat #JobKiBaat " शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधी यांनी यापूर्वी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, यापूर्वी शनिवारी महागाईवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत म्हटलं होतं की, "दररोजच्या जीवनावश्यक वस्तूमध्ये उपलब्ध असणारी अशी कोणती वस्तू आहे का, जेथे सरकार तुम्हाला लुटत आहे असं आपल्याला वाटत नाही?" (वाचा - Mann Ki Baat, February 28, 2021 Live Streaming: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' द्वारे साधणार देशवासियांशी संवाद; येथे ऐका Live)
हिम्मत है तो करो-#KisanKiBaat #JobKiBaat
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 28, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या अगोदर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर लोकांना या महिन्याच्या सुरुवातीला 'मन की बात' कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या विषयांवर कल्पना आणि सूचना विचारल्या होत्या. पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाची ही 74 वी आवृत्ती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'मन की बात' कार्यक्रमात देशातील वाढत्या कोरोना प्रकरणाच्या विषयावर आणि 1 मार्चपासून सुरू होणार्या लसींच्या दुसऱ्या टप्प्यावर आपले मत मांडू शकतात. याशिवाय ते विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भात चर्चा करू शकतात. तसेच त्यांना काही टिप्सही देऊ शकतात.