Rahul Gandhi: कर्नाटकमधील मंड्या येथे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जाहीर सभा पार पडली. राहुल गांधी यांनी यावेळी नोकरी, बेरोजगारी, महागाई, कर्जमाफी अशा अनेक विषयांवर भाष्य केले. काँग्रेस (Congress)चे सरकार हे जगातील पहिले सरकार असेल, जे तरुणांना शिकाऊ शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचे काम करेल. या योजनेचे नाव 'पहली नौकरी पक्की' असे असेल. याचा अर्थ काँग्रेस बेरोजगार तरुणांना पहिल्या नोकरीचा हक्क देणार आहे. आम्ही भारतात किमान वेतन 400 रुपये असे ते म्हणाले. तसेच, मनरेगा योजना गावाबरोबरच शहरांमध्येही राबवणार असल्याचं आश्वासन त्यांनी जनतेला दिलं. (हेही वाचा :Rahul Gandhi: राहुल गांधींची वायनाडमध्ये प्रचारयात्रा; म्हणाले सर्वांनी एकत्र येण्याचे केले आवाहन )
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना श्रीमंतांच्या कर्जमाफीवर भाष्य केले. ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील 25 सर्वात श्रीमंत लोकांचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. हा पैसा कुठूण आला. तर, हा पैसा 24 वर्षांच्या मनरेगाचा आहे. करोडपतींचे कर्ज माफ होऊ शकते तर शेतकऱ्यांचे का नाही? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. असे राहूल गांधी म्हणाले.
#WATCH हमारी सरकार दुनिया की पहली सरकार होगी जो अप्रेंटिस का अधिकार अपने युवाओं को देने जा रही है...हिन्दुस्तान में हम 400 रुपए प्रतिदिन न्यूनतम मजदूरी करेंगे...मनरेगा योजना हम गांव के साथ शहरों में भी लागू करेंगे...: कर्नाटक के मांड्या में जनसभा को संबोधित करते हुए कांग्रेस नेता… pic.twitter.com/L4ygBA6jYI
— ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2024