Rahul Gandhi: राहुल गांधींची वायनाडमध्ये प्रचारयात्रा; म्हणाले सर्वांनी एकत्र येण्याचे केले आवाहन

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वायनाडमध्ये (Wayanad) प्रचारयात्रेत सहभाग घेतला आहे. यावेळी ते म्हणाले, की आपण आपापसात भांडणं किंवा एकमेकांचा तिरस्कार करणं आवश्यक नाही. सर्वांनी एकत्र आल्यास आपला देश खूप पुढे जाईल. यावेळी त्यांनी वायनाडमधील स्थानिक समस्यांबाबत देखील भाष्य केलं. "भारतीय जनतेने अनादर करण्याची, द्वेष करण्याची किंवा एकमेकांशी भांडण्याची गरज नाही... एकजूट आणि एकत्र काम केले तरच देश महान होऊ शकतो. यावेळी राहुल गांधी यांनी आपण हत्तीच्या हल्ल्यात मारले गेलेल्या पिडीतांच्या कुटुंबाची देखील भेट घेतली.  (हेही वाचा -  Loksabha Election 2024: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडती)

पाहा पोस्ट -

दरम्यान भाजपने जारी केलेले ‘संकल्प पत्र’ हे खोट्या आश्वासनांचे (जुमला) पत्र’’ आहे अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. महागाई आणि बेरोजगारी हे दोन शब्द भाजपच्या जाहीरनाम्यातून आणि पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातून गायब असल्याचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.   काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘‘भाजपचे संकल्प पत्र हा देखावा असून त्यांचा खरा संकल्प राज्यघटना बदलण्याचा आहे. देश, समाज आणि लोकशाही विरोधी सर्व कट भाजप आधी तळातून सुरू करतो. सुरुवातीला त्यांचे नेते जनतेसमोर राज्यघटनेची शपथ घेतात आणि रात्री राज्यघटना संपविण्याची पटक​था लिहिली जाते.

‘‘लोकांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास भाजप तयार नाही. दुसरीकडे ‘इंडिया’ आघाडीची योजना पूर्णपणे स्पष्ट आहे. ३० लाख पदांवर भरती आणि प्रत्येक शिक्षित युवकाला एक लाख रुपये पगाराची पक्की नोकरी, त्यामुळे युवावर्ग यावेळी मोदींच्या आश्वासनाला फसणार नाही. तर काँग्रेसचा हात मजबूत करून देशात रोजगार क्रांती आणणार आहे,’’ असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.